घरताज्या घडामोडीसंकटाच्या काळात कोणीही विचारपूस केली नाही, यामिनी जाधवांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

संकटाच्या काळात कोणीही विचारपूस केली नाही, यामिनी जाधवांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

Subscribe

संकटाच्या काळात आमची साधी चौकशीही करण्यात आली नसल्याचं मनात शल्य असल्याचं भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर हँडलवरून यामिनी जाधव यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून त्यात त्यांनी पक्षावर राग का आहे याचं स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाची धाड पडली होती. (Yamini Jadhav Emotional video viral talking about her cancer)

यामिनी जाधव व्हिडीओमध्ये म्हणतात की, गेल्या काही दिवसांत अनेक घडामोडी घडत आहोत, त्यानुसार महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही नक्कीच समजू शकतो. आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत, यापुढेही शिवसैनिकच राहणार आहोत. माझे पती यशवंत जाधव गेले ४३ वर्षे शिवसैनिक आहेत. अनेक अडचणी आल्या. आर्थिक संकंटं आलीत. निवडणुकाही हरलो. पण तरीही त्यांनी पक्षाविरोधात विचार केला नाही.

- Advertisement -

आणखी वाचा 

त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या ऑक्टोबर महिन्यात माझ्या आयुष्यात एक वादळ आलं. कॅन्सर नावाचं. मला कॅन्सरचं निदान झाल्याचं समजताच संपूर्ण कुटुंब हादरलं. पक्षातील नेत्याला असा आजार झाल्यास पक्षप्रमुखांना कळवण्याचा नियम असतो. त्याप्रमाणे यशवंत जाधव यांनी पक्षाला कळवलंही. पण त्यांच्याकडून साधी विचारपूसही करण्यात आली नाही. महिला आमदार कॅन्सरग्रस्त आहे, त्यामुळे माझी अपेक्षा होती. पण त्यांनी चौकशीही केली नाही. माझ्या मतदारसंघातील शिवसैनिकांनी मला या काळात खूप साथ दिली. माजी महापौर किशोरीताईही भेटायला आल्या. त्यांनी माझ्यासोबत दोन तास चर्चा केली. मला मार्गदर्शन केलं. अध्यात्मिक सल्ला दिला. पण ज्यांच्याकडून अपेक्षा होती की मला आणि माझ्या कुटुंबाला आधाराची थाप दिली जाईल. पण तसं झालं नाही. ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्या कोणीही कोणत्याही नेत्याने माझी विचारपूस केली नाही.

- Advertisement -


दरम्यान, यामिनी जाधव यांच्या घरी एप्रिल महिन्यात आयकर विभागाने मोठी कारवाई केली होती. या आयकर विभागाने जाधव, त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांच्या कथित 41 मालमत्ता जप्त केल्या. आयकर विभागानं जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये भायखळ्यातील बिलाखडी चेंबर्स इमारतीमधील 31 फ्लॅट, वांद्रे येथे पाच कोटी किमतीचा एक फ्लॅट आणि भायखळ्यातील हॉटेल इम्पेरियल क्राऊनचा समावेश आहे. आयकर कायद्याच्या कलम 132 (9)बी अंतर्गत ही मालमत्ता ताब्यात घेण्यात आलीय.

हेही वाचा – शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

भायखळ्याच्या आमदार असलेल्या यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या प्राथमिक तपासात प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कोलकाता शेल कंपनीसोबतचे व्यवहार उघडकीस आले होते. प्रधान डीलर्सकडून सुमारे 15 कोटी रुपये मिळाले होते, ज्याची नंतर गुंतवणूक करण्यात आली होती. भायखळ्यातील एक इमारत आहे. जाधव कुटुंबाने प्रधान डिलर्सना पैसे परत केले, त्यांनी ही रक्कम न्यूजहॉक मल्टी मीडियाकडे हस्तांतरित केली. जाधव यांनी न्यूजहॉक मल्टी मीडियाच्या माध्यमातून बिलाकडी चेंबर्समध्ये 31 फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे. जाधव यांनी इमारतीतील चार ते पाच भाडेकरूंना रोख रक्कम दिली आणि प्रत्येकी 30 ते 35 लाखांपर्यंत पैसे दिले. आणखी 40 मालमत्तांचा तपास सुरू असून, त्यांचा जाधव यांच्याशी संबंध असल्याचा संशय आहे. परदेशात हवाला रॅकेट चालवत असल्याचाही जाधव यांच्यावर आरोप आहे.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -