राजेंद्र पाटील- यंड्रावकर समर्थक आणि शिवसैनिक राडाप्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल

jayshingpur

जयसिंगपूरमध्ये बंडखोर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यंड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये काल अभूतपूर्व राडा झाला होता. यावेळी पोलिसांना या दोन्ही मोर्चेकऱ्यांना सांभाळताना बरीच कसरत करावी लागली. दोन्ही गटाकडून एकमेकांवर धावून जाण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, पोलिसांनी प्रसंगधावनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, पोलिस आता अॅक्शनमध्ये आले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटातील मिळून सुमारे 200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख आणि माजी उपनगराध्यक्षावर गुन्हा –

परवानगीविना बेकायदेशीर जमाव जमविणे, घोषणाबाजी करून मोर्चा काढणे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे या आरोपाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर यड्रावकर गटाकडून जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचाही समावेश आहे.

काय घडले –

पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी आम्ही यड्रावकर म्हणत शेकडो समर्थक राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयासमोर जमले होते. यड्रावकर यांनी शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. शिवसैनिकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली.