Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र MPSC परीक्षेतील भाजप धार्जिणा प्रचार रोखा; यशोमती ठाकूर यांची मागणी

MPSC परीक्षेतील भाजप धार्जिणा प्रचार रोखा; यशोमती ठाकूर यांची मागणी

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील प्रश्नांना आक्षेप

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महिला आणि बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून केली. मुख्यमंत्र्यांना निवेदन देत त्यांनी ही मागणी केली आहे.

याबाबत ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, एमपीएससी परीक्षेचं संघीकरण करण्यात येत असून परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजपा धार्जिणा राजकीय प्रचार तसेच काँग्रेस विरोधी भूमिका रुजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत भारत सरकार किंवा केंद्र सरकार असा उल्लेख टाळून आवर्जून मोदी सरकार असा उल्लेख असलेला उतारा प्रश्नपत्रिकेत सामील करण्यात आला होता.

- Advertisement -

याच प्रश्नपत्रिकेत काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती निवडली असा तथ्यहीन आरोप असलेला उतारा जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आला. यातून काँग्रेसची बदनामी करण्याचा स्पष्ट हेतू दिसून येत आहे, असे ऍड. ठाकूर म्हणाल्या. दरवर्षी लाखो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा देत असतात. मागील परीक्षेत मनुस्मृतीसंदर्भात वादग्रस्त प्रश्न सामील करण्यात आले होते.
जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी संबंधित अभ्यासक्रम रुजवण्यात येत असल्याची टीका ॲड. ठाकूर यांनी केली. अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

 

- Advertisement -