घरमहाराष्ट्रमहिला कैद्यांसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम राबविणार - यशोमती ठाकूर

महिला कैद्यांसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम राबविणार – यशोमती ठाकूर

Subscribe

महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. महिला कारागृहातील कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे, तसेच त्यांना विधिसेवेचे सहकार्य देऊन त्यांना मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभागाची भूमिका याबाबत मंत्रालयात नुकतीच बैठक झाली.

किरकोळ कारणासाठी कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी, कायदेशीर मदत मिळत नसल्यामुळे कारागृहात रहावे लागणाऱ्या महिलांना कायदेशीर मदत करून त्यांना कारागृहातून सोडवणुकीसाठी सहकार्य करणे, त्यांचे समुपदेशन करणे यासाठी महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरण, तुरुंग प्रशासन यांच्यासमवेत अशा महिलांच्या कायदेशीर सहकार्यासाठी राज्य महिला आयोगाचा सहभाग घेवून ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

- Advertisement -

कारागृहात असलेल्या महिलांना विधिसेवेचे सहकार्य देण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्रातील महिला कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे याचा अभ्यास करणे आणि त्यांच्या गरजेनुसार विधिसेवा सहकार्य, समुपदेशन देणे. त्यांना आवश्यक असल्यास पुनर्वसनासाठी मदत करणे या पद्धतीचे काम विभागाच्या माध्यमातून करता यावे म्हणून मिशन मुक्ता कार्यरत असेल. यामध्ये कैद्यांच्या पुनर्वसनकरिता काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचाही सहभाग असेल, असेही यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -