घरमहाराष्ट्रYashwant Jadhav Scam : मोठी बातमी! यशवंत जाधवांनी दोन वर्षांत घेतल्या 36...

Yashwant Jadhav Scam : मोठी बातमी! यशवंत जाधवांनी दोन वर्षांत घेतल्या 36 हून अधिक मालमत्ता, 1 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Subscribe

शिवसेना नेते यशवंत जाधव, त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी गेल्या दोन वर्षांत मुंबईतल्या 36 हून अधिक जुन्या मालमत्ता विकत घेतल्याचा त्यांनी आरोप केलाय. यात एक हजारांहून अधिक दुकानं, गाळे आणि घरं आहेत. जुन्या मालमत्ता पगडी चाळीत रोखमध्ये पैसे देऊन त्या खरेदी केल्यात.

मुंबईः मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यामागे आयकर विभागाचा ससेमिरा लागलाय. यशवंत जाधव आणि अग्रवाल या दोघांनी मिळून मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याची धक्कादायक माहिती आयकर विभागाच्या चौकशीत उघडकीस आलीय. भाजप नेते किरीट सोमय्यांनीही यशवंत जाधवांवर गंभीर आरोप केलेत.

शिवसेना नेते यशवंत जाधव, त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी गेल्या दोन वर्षांत मुंबईतल्या 36 हून अधिक जुन्या मालमत्ता विकत घेतल्याचा त्यांनी आरोप केलाय. यात एक हजारांहून अधिक दुकानं, गाळे आणि घरं आहेत. जुन्या मालमत्ता पगडी चाळीत रोखमध्ये पैसे देऊन त्या खरेदी केल्यात. 1 हजाराहून अधिक कोटींचा घोटाळा बाहेर आलाय. ईडी, आयकर विभाग आणि कंपनी मंत्रालयानं चौकशी सुरू केलीय. येत्या काही दिवसांत कारवाई होईल, असा मला विश्वास आहे, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.

- Advertisement -


किरीट सोमय्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. यशवंत जाधवांकडेच एवढी प्रॉपर्टी असेल तर त्यांच्या नेत्यांकडे किती असेल, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवरही हल्लाबोल केलाय. विशेष म्हणजे यशवंत जाधवांनी आतापर्यंत खरेदी केलेल्या मालमत्तांची यादीही माध्यमांच्या हाती लागलीय. यशवंत जाधवांनी सरासरी 20 दिवसांत एक मालमत्तेची खरेदी केलेली आहे. यशवंत जाधव यांनी मार्च 2020 मध्ये 1 मालमत्ता खरेदी केली. तसेच यशवंत जाधवांकडून डिसेंबर 2020 मध्ये 2 मालमत्ता खरेदी, जानेवारी 2021 मध्ये 3 मालमत्ता खरेदी, फेब्रुवारी 2021 मध्ये 2 मालमत्ता खरेदी, मार्च 2021 मध्ये 5 मालमत्ता खरेदी, मे 2021 मध्ये एक मालमत्ता, जून 2021 मध्ये 2 मालमत्ता, जुलै 2021 मध्ये 6 मालमत्ता, ऑगस्ट 2021 मध्ये 2 मालमत्ता, डिसेंबर 2021 मध्ये 3 मालमत्ता खरेदी करण्यात आल्यात.

वांद्रे येथील वॉटर फिल्ड क्रॉस रोड IV येथे 5 कोटी 10 लाखांची मालमत्ता खरेदी केलीय. माझगावमधील बिलखाडी चेंबर्स येथे 2 कोटींची मालमत्ता खरेदी केलीय. माझगाव वाडी बंदर येथे 1 कोटी 60 लाखांच्या किमतीची मालमत्ता खरेदी करण्यात आलीय. तर भायखळ्यातील व्हिक्टोरिया गार्डन येथे 2 कोटी 20 लाखांची मालमत्ता खरेदी केलीय. यशवंत जाधवांकडून शेल कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करण्यात आल्याचं आयकर विभागाच्या चौकशीत समोर आलंय. यशवंत जाधवांनी 15 कोटी रुपये प्रधान डिलर्सकडून कर्ज म्हणून घेतले आहेत. काळा पैसा पांढरा करून पत्नी आणि मुलाच्या नावे खात्यात जमा केल्याचीही माहिती आयकर विभागाच्या चौकशीत मिळालीय.

- Advertisement -

हेही वाचाः India Corona Update Today: देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आजही घट! 24 तासांत 1761 नव्या रुग्णांची नोंद

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -