पुण्यातील हत्याकांडाचे गूढ वाढले, पुरलेले मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले

पुण्यातील दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा पोलिसांनी तपास केला असता, ही हत्या असल्याचे समोर आले. त्यानंतर आता पुन्हा या हात्याकांडाला वेगळं वळण लागताना दिसत आहे.

पुण्यातील दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा पोलिसांनी तपास केला असता, ही हत्या असल्याचे समोर आले. त्यानंतर आता पुन्हा या हात्याकांडाला वेगळं वळण लागताना दिसत आहे. (Yavat Murder Case 3 Dead Bodies Out Of 7 Taken Out For Postmortem)

मिळालेल्या माहितीनुसार, या सात मृतांचे अंत्यविधी केल्यानंतर त्यातील तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी पुन्हा बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे अंत्यविधी केलेले तीन मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयातील टीमने पुन्हा बाहेर काढले आहेत. तसेच पुण्याच्या ससून रुग्णालयाचे एक पथक मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी आज यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होते.

या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, भीमा नदीपत्रात सापडलेल्या सातही जणांची हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर या हत्येप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.

भीमा नदी पात्रात बुधवारपासून (18 जानेवारी 2023) टप्प्याटप्याने सात मृतदेह आढळत होते. सातही जण एकाच कुटुंबातील होते. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची पाच पथके कार्यरत होती. काही पुराव्यांच्या आधारे ही आत्महत्या नसून खून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी विविध ठिकाणांवरून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे

 • अशोक कल्याण पवार (६९ )
 • शाम कल्याण पवार (३५)
 • शंकर कल्याण पवार (३७)
 • प्रकाश कल्याण पवार (२४)
 • बहिण कांताबाई सर्जेराव जाधव (४५)

या घटनेतील मृतांची नावे

 • मोहन उत्तम पवार (४५)
 • संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार (४०)
 • शाम पंडीत फुलवरे (२८)
 • राणी शाम फुलवरे (२४)
 • रितेश उर्फ भैय्या (७)
 • छोटू शाम फुलवरे (५)
 • कृष्णा शाम फुलवरे (३)

हेही वाचा – अखेर सत्य समोर आलं! ‘त्या’ सात जणांची हत्याच; पोलिसांची माहिती