मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक भागातील नदी नाले दुथडी भरुन वाहत लागल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पण पावसाने काल राज्यातील काही भागांमध्ये उसंत घेतल्याचे चित्र पाहायला मिळत असले, तरही आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे. तसेच हवामान विभगानाने आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच हवामान विभगानाने आज विदर्भ, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकोणात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात पाऊस ओसरण्यात सुरुवात होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, ईशान्य भारतातील आसाम, मेघायलय, मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाच हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेही वाचा – मुंबईत पावसाची उसंत; तीन ठिकाणी घरांच्या पडझडी; 4 जण जखमी
राज्यातील 32 धरणात महिन्याभरात दुप्पटीने वाढ
राज्यातील धरण प्रमुख 32 धरणातील जलसाठ्यात महिन्याभरात दुप्पटीने वाढ झालेली आहे. राज्यातील 32 धरणांमध्ये 55 टक्के भरली असून हा आकडा 10 वर्षाच्या सरासरीहून अधिक असला तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत यात सुमारे 30 टक्क्याची तुट आहे. केंद्रीय जल आयोगाकडून देशभरातील प्रमुख 146 धरणे आणि जलाशयावर देखरेख केली जात असून यातील सर्वाधिक धरणे ही महाराष्ट्रातील आहे. 146 धरणांमध्ये 30 जून अखेरीस 69 टक्के पाणीसाठा होता. राज्यातील 32 धरणे ही त्यावेळी 21टक्के भरली होती. आता हा आकडा 55 टक्कापर्यंत गेल्यामुळे समाधानाची गोष्टी आहे