घरदेश-विदेशदोन हजार कोटींची गुंतवणूक महागड्या पेंटिंग्स, बोगस कंपन्या

दोन हजार कोटींची गुंतवणूक महागड्या पेंटिंग्स, बोगस कंपन्या

Subscribe

येस बँकेचा संस्थापक कपूरकडे मिळाले घबाड,येस बँक आर्थिक घोटाळा

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याच्या घरावर छापा घातल्यानंतर ईडीला त्याच्याकडे घबाड मिळाले आहे. दोन हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक, ४४ महागडी पेंटिंग्स आणि एक डझनपेक्षा जास्त नोंदणीकृत खोट्या कंपन्यांची नोंद ईडीच्या हाती लागली आहे. मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने राणाला अटक केली आहे. ईडीच्या चौकशीत राणा कपूर महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणा कपूरशी संबंधित अनेकांचे धाबे दणाणले आहेत. ईडीच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ईडीने राणा कपूरकडून काही कागदपत्रे हस्तगत केली आहेत.

त्यानुसार राणाच्या कुटुंबियांनी लंडनमध्ये मालमत्ता विकत घेतली आहे. ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्यांनी पैसे कुठून आणले याचा तपास आता ईडी करत आहे. मुंबईच्या विशेष हॉलिडे कोर्टाने कपूरला ११ मार्चपर्यंत ईडीची कोठडी दिली आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी राणा कपूरच्या दक्षिण मुंबईतील पॉश घरावर छापा टाकला. राणाची बायको आणि तीन मुलींना ६०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी देवान हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबंध असलेल्या एका कंपनीकडून मिळाला आहे. या कंपनीचे नियंत्रण राणाची बायको आणि तीन मुलींकडे आहे.

- Advertisement -

कपूरशी संबंधित कंपनी डूईट अर्बन वेंचर (इंडिया) प्रा. लिमिटेड या कंपनीला निधी मिळाला. येस बँकेने तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज जेव्हा डीएचएफएल कंपनीला मंजूर केले तेव्हा निधी मिळाला आहे. डीएचएफएल या कंपनीची आर्थिक गैरव्यवहार आणि निधी वळवणे याबाबत चौकशी सुरू आहे.

डीएचएफएलकडून एनपीए झालेले कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने कोणतीही कारवाई केलेली नाही. कपूर याच्याशी संबंधित कंपनीला ६०० कोटी रुपये मिळाले ते हे कर्ज वसूल केले जाऊ नये, या बदल्यात मिळाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, राणा कपूर, त्याची पत्नी बिंदू आणि तीन मुलींच्या घरांवर ईडीने छापे टाकले तेव्हा त्यांनी २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गेलेल्या गुंतवणुकीच्या नोंदी आढळल्या. तसेच डझनपेक्षा जास्त बोगस कार्यशील कंपन्यांच्या नोंदीही सापडल्या. ईडीच्या अधिकार्‍यांना राणाच्या कुटुंबियांनी खरेदी केलेल्या ४४ महागड्या पेंटिंग्स सापडल्या आहेत. त्यापैकी काही पेंटिंग्स राजकीय नेत्यांनी केलेल्या आहेत.

- Advertisement -

येस बँकेच्या एटीएमवर गर्दी
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर घातलेल्या निर्बंधानंतर रविवारी बँकेने एटीएम सेवा सुरू केल्याने बँकेच्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. बँकेकडून याबाबतचे संदेश ग्राहकांच्या मोबाईलवर प्राप्त होताच रविवारी सकाळी नाशिक शहरातील बँकेच्या ग्राहकांंनी एटीएम केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून आले. दुपारपर्यंत येस बँकेच्या एटीएममधील रोकड संपल्याने ग्राहकांना पैसे न काढताच परतावे लागले तर इतर बँकेच्या एटीएम केंद्रावरही पैसे काढता येत असल्याने ग्राहकांनी या एटीएमवर आपला मोर्चा वळवला. सुमारे ४० ते ५० हजार खातेदार असलेल्या या बँकेच्या नाशिक शहरात पाच शाखा असून जिल्ह्यात 14 शाखा आहेत, तर शहरात बँकेचे 11 एटीएम केंद्र आहेत.

शुक्रवारी आरबीआयने येस बँकेवर लादलेल्या निर्बंधांनतर शहरातील थत्तेनगर येथील मुख्य शाखेत ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. नुकतेच अनेकांचे वेतन बँकेत जमा झाल्याने आता हक्काचे पैसे मिळतील का, बँकेतील ठेवींचे काय यासारख्या प्रश्नांनी ग्राहकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. बँकेने एटीएम केंद्र सुरू केल्याने ग्राहकांना काहीअंशी का होईना दिलासा मिळाला असला, तरी ऑनलाईन व्यवहार मात्र ठप्पच आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांनी आपल्या हप्त्यांसाठी येस बँकेशी कर्जखाते संलग्न केले आहे, त्यांना मात्र भुर्दंड सोसावा लागणार आहे. याबाबत बँकेकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -