घरदेश-विदेशयेस बँकेवरील निर्बंध हटले; व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू

येस बँकेवरील निर्बंध हटले; व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू

Subscribe

आर्थिक गैरव्यवहारामुळे निर्बंध घालण्यात आलेल्या खाजगी क्षेत्रातील येस बँकेची सेवा बुधवारी दोन आठवड्यानंतर पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी सहा वाजता येस बँकेवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना आता नेहमीप्रमाणे व्यवहार करता येणार आहेत.

बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात कर्ज वाटपात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने ५ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता निर्बंध घातले होते. ३ एप्रिलपर्यंत खातेदारांना ५० हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली होती.

- Advertisement -

बुधवारी बँकेवरील निर्बंध दूर झाले असून ग्राहकांना पूर्वीप्रमाणे सर्व सेवा उपलब्ध झाल्या आहेत. खातेदारांकडून पैसे काढण्याची शक्यता लक्षात घेत बँकेने ३० हजार कोटींची तरतूद केली आहे. ज्यात २२००० कोटींच्या सरकारी बँकांमधील ठेवी आणि ९००० कोटींचे आंतरबँक कर्जे आहेत. येस बँकेचे ग्राहक उद्या, बुधवारपासून सर्व बँकिंग व्यवहार करू शकतील, असे बँकेने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

१८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून संपूर्ण बँकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली. ग्राहकांनी गुरुवारपासून बँकेच्या नेहमीच्या कालावधीत व्यवहार करावेत. बँकेच्या डिजिटल बँकिंग सेवा व मंच यांचाही ग्राहकांना वापर करता येईल, असे बँकेने म्हटल आहे.

- Advertisement -

आर्थिक संकटात येस बँक सापडल्यामुळे अनेक बँकांनी तिच्यात गुंतवणूक केली आहे. मात्र ही गुंतवणूक केवळ बँकेला आर्थिक स्थैर्य लाभावे यासाठीच करण्यात आली आहे, असे भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटल होतं. येस बँक घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी, सुभाष चंद्रा, नरेश गोयल यांना समन्स जारी केले. अनिल अंबानी यांच्या समूहाने जवळपास १२ हजार ८०८ कोटी रुपयांचे कर्ज बुडवले व त्यात परदेशी रकमेचा दुरुपयोग झाल्याचा ईडीचा संशय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -