घरमहाराष्ट्रहोय, मला ईडीची नोटीस मिळाली; खडसेंनी सोडलं मौन

होय, मला ईडीची नोटीस मिळाली; खडसेंनी सोडलं मौन

Subscribe

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसे यांनी ईडीची नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली होती. याला आता खुद्द एकनाथ खडसे यांनी दुजोरा दिला आहे. होय, मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. सुरुवातीला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं खडसेंनी म्हटलं होतं. दरम्यान, ईडी नोटीसीनंतर पहिल्यांदा मौन सोडलं आहे. माझ्यावर अन्याय होत असल्याचं लोकांना वाटतंय. मला सतत फोन येत आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

“होय, मला ईडीची नोटीस मिळाली आहे. ईडीची नोटीस आल्यानंतर मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत. मला सहानुभूतीच मिळत आहे. वारंवार चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत, पण काही निर्णय असतात, त्या अधीन राहून काम करायचं असतं,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबरला चौकशीसाठी ED कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आला आहे. पुण्यातील भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ED नं एकनाथ खडसे यांना नोटीस बजावल्याचं बोललं जात आहे. मात्र, तरीही एकनाथ खडसे यावर बोलणं टाळत होते. दरम्यान, एकनाथ खडसे जळगाव येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजतं. आता एकनाथ खडसे पत्रकार परिषदेत काय स्फोट करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -