घरमहाराष्ट्रहोय, पत्रकार शशिकांत वारिशेंची हत्या पूर्वनियोजितच; आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

होय, पत्रकार शशिकांत वारिशेंची हत्या पूर्वनियोजितच; आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

Subscribe

Journalist Shashikant Warishe Deathcase | नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी हस्तांतरित झालेल्या जमिनीसंदर्भात वारिशे यांनी बातमी दिली होती. ही बातमी एकप्रकारे नाणार रिफायनरीला प्रकल्पाला एकप्रकारे विरोध करणारी होती त्यामुळेचं वारिशे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप नाणार विरोधी संघटनांनी केला आहे.

Journalist Shashikant Warishe Deathcase | राजापूर – पत्रकार शशिकांत वारिशे मृत्यूप्रकरणात (Journalist Shashikant Warishe) आरोपी पंढीरनाथ आंबेरकर याने हत्येची कबुली दिली आहे. पूर्वनियोजित हत्या असल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे हे पाहण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात शशिकांत वारिशे या पत्रकाराचा अपघात घडवून आणला होता. शशिकांत वारिशे यांच्या गाडीला सहा फेब्रुवारीला एका धरधाव गाडीने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याचा गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी हस्तांतरित झालेल्या जमिनीसंदर्भात वारिशे यांनी बातमी दिली होती. ही बातमी एकप्रकारे नाणार रिफायनरीला प्रकल्पाला एकप्रकारे विरोध करणारी होती त्यामुळेचं वारिशे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप नाणार विरोधी संघटनांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वारीशे मृत्यू प्रकरणात शरद पवार म्हणाले, “एका आठवड्यात तिथे…”

याप्रकरणी ८ फेब्रुवारीला पोलिसांनी संबंधीत गाडीचे चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याची सात दिवसांची पोलीस कोठडी काल संपली. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केले असता पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी (विशेष शोधपथक) मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हा तपास होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, एका वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पंढरीनाथ आंबेरकर याने खुनाची कबुली दिली आहे. ही हत्या पूर्वनियोजित होती, असंही त्याने कबुल केले आहे. त्यामुळे, पोलिसांना त्याचे बँक खाते तसेच कॉल रेकॉर्डचे तपशील मिळाले आहेत. या कृत्यात आणखी काही लोक गुंतले आहेत का हे तपासण्यासाठी पोलीस त्या तपशीलाची छाननी करत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.

“आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. रिफायनरी विरोधी कार्यकर्त्यांना धमकावणे आणि मारहाण करणे, अशा अनेक तक्रारी त्याच्याविरोधात आहेत. पंढरीनाथ आंबेरकर रिफायनरी समर्थक होता आणि प्रकल्पाचे भूसंपादन सोपे होण्याकरता तो काम करत होता,” असंही पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा – पत्रकार शशिकांत वारीशे मृत्यू प्रकरणाची आता SIT चौकशी; गृहमंत्री फडणवीसांचे आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -