घरमहाराष्ट्रहोय, आम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत अन् विकृत; फडणवीसांच्या 'त्या' टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

होय, आम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत अन् विकृत; फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कथित भाजपा नेत्याचे कॅसिनोतील फोटो ट्वीट करत भाजपावर हल्ला चढवला. त्यानंतर ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला असतानाच खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा माध्यमांसमोर येत माझ्याकडे आणखी फोटो आणि व्हिडीओ असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांची विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहीजे, असे म्हटले. यावर आता संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Yes we are mentally weak and deformed Sanjay Raut response to Fadnavi criticism Chandrashekhar Bawankule Macau casino)

हेही वाचा – भाजपाच्या लोकांना चांगले दिवस आले; कॅसिनो प्रकरणी संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, होय, आम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत आहोत, कारण आमची मानसिकता महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षण करण्याची आहे. तुमच्या सारख्या लोकांशी लढण्याची आमची मानसिकता आहे. तुमच्यासारख्या दरोडेखोरांशी लढणे आणि देश वाचवणे हीच आमची विकृती आहे आणि मानसिकदृष्ट्या ही आपली विचारधारा आहे.

देशात दंगली घडवणे, जातीच्या आधारावर मारामारी करणे, देश लुटणे, उद्योगपतीला देश विकणे ही आमची मानसिकता नाही. जे तुमचे राजकीय विरोधक आहेत त्यांच्या मुलांमागे एजन्सी उभी करण्याची ही विकृती तुमची आहे, आमची नाही. आम्ही त्यांना हाकलून दिलं तर ते देश सोडून जातील. तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. पण आमची ती संस्कृती नाही. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे की, कोणाच्याही घरापर्यंत जाऊ नका. पण त्याची मानसिक एवढी दुर्बल आहे की ते राजकीय विरोधकांच्या मुलांमागे, बायकोमागे आणि घरापर्यंत एजन्सी पाठवत आहेत आणि राजकारण करत आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातील सभेवर मनोज जरांगे पाटील म्हणाले; “समाजाचा…”

मोदी आणि आदित्य ठाकरेंचा ब्रॅण्ड एकच

भाजपाने ट्वीट केलेल्या आदित्य ठाकरेंच्या फोटोबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जो फोटो पोस्ट केला आहे तो नीट बघा. तो ग्लास आहे की डाएट कोकचा कॅन आहे? एकदा नीट बघा. मोदींचे असे किती फोटो दाखवू? मोदी जे पितात तोच ब्रॅण्ड आदित्य ठाकरे पित होते. पण हे लोक इतके घाबरले की त्यांना फोटो पोस्ट करताना भान राहिलेलं नाही. इतक्या डरपोक लोकांच्या हातात ईडी आणि सीबीआय आहे, म्हणून यांच्यातली मर्दांगी जागी झाली आहे. या दोन एजन्सी आणि पोलीस यांच्या हातात नसतील ना तर यांच्यासारखे डरपोक लोकं नाहीत. टोळधाडवाले मला धमक्या देत आहेत, हिंमत असेल तर या समोर उगाच तोंडपाटीलकी करू नका, कधी यायचं सांगा, असे आव्हान संजय राऊत यांना भाजपाला दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -