घरट्रेंडिंगमुंबईकरांनो सीएसएमटी स्टेशनवर 'आयुष्य' वाढवा, 'नासा' ची रोपटी लागली व्हर्टीकल गार्डनमध्ये

मुंबईकरांनो सीएसएमटी स्टेशनवर ‘आयुष्य’ वाढवा, ‘नासा’ ची रोपटी लागली व्हर्टीकल गार्डनमध्ये

Subscribe

नुकतेच मध्य रेल्वेचा नाशिक रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर सुरु केले आहे. तर आता चक्क मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकात नासा मान्यता असलेले रोपटे लावण्यात येणार आहे.

सातत्याने होणारी वृक्षतोड, दिवसागणिक वाढणार्‍या गाड्यांची संख्या, सिमेंट काँक्रीटच्या टोलेजंग इमारती अशा काही गोष्टींमुळे पर्यावरणाची हानी होते आहे. अशात आपल्याला किमान शुद्ध हवा मिळावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते. हीच बाब लक्षात घेता मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून दुषित हवेला शुध्द करण्यासाठी प्रवाशांच्या आरोग्याला फायदेशीर असलेल्या हवेसाठी ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एंड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NASA)’ कडून मान्यताप्राप्त झालेली, देशविदेशाती 22 प्रकारची रोपटी व्हर्टिकल गार्डनमध्ये लावण्यात आली आहे. त्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या आरोग्याला फायदेशीर अशी शुध्द हवा मिळत आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाला अनेक पुरस्कार सुध्दा झाले आहेत. नुकतेच मध्य रेल्वेचा नाशिक रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर सुरु केले आहे. तर आता चक्क मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकात नासा मान्यता असलेले रोपटे लावण्यात येणार आहे.

रोपट्यांमध्ये एपिप्रिमनम ऑरियम , फिलोडेन्ड्रॉन ऑक्सिकार्डियम, फिलोडेन्ड्रॉन सिलोन गोल्डन,रूट ब्रिज , अ‍ॅकॅलीफा विल्केेसियाना यांसारख्या जातींची 22 प्रकारचे रोपटी आहेेत. फिलोडेन्ड्रॉन ऑक्सिकार्डियम हे रोपटे वेलींसारख्या असते. जाळीदार ताटी किंवा साखळी दुवा कुंपणावर ते वाढू शकते. त्यामुळे नियमित यांची देखरेख करावी लागते.

- Advertisement -
CSMT
सीएसएमटी स्थानकात नासा मानत्याप्राप्त अशा रोपट्यांमुळे प्रवाशांना शुद्ध हवेचा दिलासा मिळणार आहे

प्लॅटफार्मवर जा, रिलॅक्स व्हा

सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या 7,8,9,10, 11आणि 17-18 प्लॅटफॉर्म क्रमांकावर हे व्हर्टिकल गार्डन आहे. ही रोपटी फ्रेंच, रशिया, अमेरिका आणि इंग्लड या देशातील आहे. मध्य रेल्वेने गार्डनचे काम एका खासगी संस्थेला दिले आहे. यासाठी मध्य रेल्वेला 4 लाख रुपयांच्या खर्च आला आहे. प्रत्येक महिन्याला या 22 प्रकारच्या रोपट्यांचा देखभाल आणि खत टाकण्यासाठी 10 हजार रुपयांच्या खर्च येत आहे. मध्य रेल्वेकडून वर्टिकल गार्डनमध्ये लावण्यात आलेल्या रोपट्यांसाठी एक विशेष टिम नियुक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोट

वेगवेगळ्या प्रकारची रोपटी रेल्वे स्थानकाच्या व्हर्टिकल गार्डन मध्ये लावण्यात आलेली आहेत.त्यामुळे रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसोबतच पर्यावरण स्नेही वातवरण प्रवाशांना मिळत आहेत.

– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी ,मध्य रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -