घरमहाराष्ट्रप्रामाणिकपणे कष्ट केल्यास यश मिळतेच-दत्तू भोकनळ

प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यश मिळतेच-दत्तू भोकनळ

Subscribe

यशोधन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवलेला दत्तु भोकनळ याने मुलांशी संवाद साधला. यावेळी मुलांचे मौलिक मार्गदर्शन त्याने केले.

संगमनेरचा भूमिपुत्र व आशियाई स्पर्धेत रोइंग या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक विजेता दत्तु भोकनळ याने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात युवकांशी मुक्तपणे संवाद साधला. युवकांना यशस्वीतेचा मंत्र देतांना आवडीचे क्षेत्र निवडून प्रामाणिकपणे कष्ट करा. तुम्हाला यश व लौकिक निश्चीत मिळेल असा मौलिक सल्ला दत्तू भोकनळ यांनी यावेळी दिला.

मोठी नोकरी नशिबात नाही म्हणून सैन्यात

यशोधन येथे आयोजित मुक्त संवाद या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद केला. यावेळी दत्तु भोकनळ म्हणाला की, “हल्लीच्या तरुणांना पटकन यश व प्रसिद्धी हवी आहे.ती मिळेलही पण त्यासाठी जिद्द व कष्ट करावे लागतात. आपल्या रोल मॉडेलचे यश तुम्हाला दिसते परंतू त्यामागचा कठिण प्रवास दिसत नाही. आपणही त्या ताकदीचे कष्ट करा तसेच यश आपल्यालाही मिळेल. माझी घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. शेतीवर पुरेसा उदरनिर्वाह होत नव्हता म्हणून मी विहरीवर कामावर जायचो. वडीलांचे छत्र हरपले, आईनेच सांभाळ केला. मोठी नोकरी नशिबात नाही म्हणून सैन्यात जाणेसाठी प्रयत्न केला. काबाडकष्ट केल्यामुळे मी त्यात उत्तीर्ण झालो. सैन्यातही विविध खेळ असतात. मी इतर खेळांसाठी प्रयत्न केला. परंतू माझ्या हातांमधील मजबूती पाहून अधिकार्‍यांनी मला रोईंगमध्ये खेळण्याची प्रेरणा दिली. स्वतावर विश्‍वास ठेवला. जीवतोड मेहनत केली. हा खेळ इतका प्रसिद्धीचा नसल्याने दुर्लक्षीत होतो.परंतु विरेंद्र सेहवागने माझ्या जीवनावर मुलाखत केली. मग मला आणखी सन्मान मिळू लागला.नुकत्याच झालेल्या स्पर्धेत मी तापाने आजारी होतो. परंतु देशाचे व गावचे नाव मोठे करण्यासाठी आजारी असतांनाही मी स्पर्धेत उतरलो व सुवर्णपदक मिळवले. हा माझ्या जिवनातील मोठा आनंद आहे. अजून पुढे भारताला ऑल्मपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहे. आणि आपण तो सर्वांच्या प्रेमामूळे मिळवू असा विश्‍वासही दत्तू भोकनळ यांनी व्यक्त केला.नवनाथ अरगडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.नामदेव कहांडळ यांनी आभार मानले.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -