घर महाराष्ट्र "माझे वय झाले असे तुम्ही म्हणता...", शरद पवारांची अमरसिंग पंडितांवर टीका

“माझे वय झाले असे तुम्ही म्हणता…”, शरद पवारांची अमरसिंग पंडितांवर टीका

Subscribe

बीड : “माझे वय झाले असे तुम्ही म्हणता. पण तुम्ही माझे काम बघितले आहे ना”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांनी अमरसिंग पंडित यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार हे राज्यात दौरा करण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची आज दुसरी सभा बीडमध्ये पार पडली.

शरद पवार म्हणाले, “या जिल्ह्यांच्या नेत्यांना काय झाले हेच कळत नाही. एका नेत्यांने सांगितले की, आमचा सहकारी पक्ष सोडून गेला, आम्ही चौकशी केली की नेमके काय झाले?, आजपर्यंत सर्व काही ठीक होते. पण, असे कळाले की, अमरसिंग पंडितांनी काहीतरी सांगितले. पवार साहेबांचे आता वय झाले. यामुळे आपल्याला भविष्याचा विचार करायचा असेल, तर दुसऱ्या नेता निवडला पाहिजे. पण मी त्यांना एवढेच सांगतो की, माझे वय झाले की, तुम्ही म्हणता पण तुम्ही माझे काम बघितले आहे.” “सत्तेसाठी पक्ष सोडणाताना पक्षांनी तुम्हाला काय दिले, यांची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे”, असा सल्ला शरद पवार यांनी बंडखोरी केलेल्या सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.

चुकीच्या लोकांना आवरायचे

- Advertisement -

पुढे बोलताना शरद पवार यांनी राज्यातील सत्ताधारी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, आता वेळ आली आहे, या चुकीच्या लोकांना आवरायचे आहे. सत्तेचा गैरवापर केल्या जात आहे. अनेकांना जेलमध्ये डांबले जात आहे. परळीत हा प्रकार खूप वाढला आहे. तर एका कार्यकर्त्यांचा दाखला देत त्याने पक्ष सोडताना माझ्या वयाचा उल्लेख केला होता. पण नेहमी माझ्या वयाचा उल्लेख करता, माझं वय झालं म्हणता, पण तुम्ही माझं काय बघितले? अशी मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी यावेळी केली.

हेही वाचा – मणिपूर जळत असताना पंतप्रधानांनी तिकडे ढुंकूनही पाहले नाही; शरद पवारांचा मोदींवर घणाघात

लोकांनी निवडूण दिलेले सरकारे पाडतात

- Advertisement -

केंद्रावर विश्वास ठेऊन चालणार नाही, लोकशाहीमध्ये जनतेने निवडूण दिलेली सरकारे पाडली जात आहे. गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकची सरकारी पाडली होती. केंद्रातील सत्ता वापरून ही उद्योग केली जात आहे. ही सगळी आव्हाने आपल्या समोर आहेत. या सरकारच्या काळात कुठे काहीही होते म्हणत सर्वसामान्य जनतेचे जीणं या सरकारने बेहाल केले असल्याचे म्हणत शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.

- Advertisment -