Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र तुम्ही इतर धर्मांवर बोलून दाखवा; सनातन धर्माच्या वादावर फडणवीसांचं आव्हान

तुम्ही इतर धर्मांवर बोलून दाखवा; सनातन धर्माच्या वादावर फडणवीसांचं आव्हान

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांनी आव्हानात्मक भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले की, सनातन धर्मावर बोलून स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांना आव्हान आहे की, इतर धर्मावर म्हणजे इस्लाम, ख्रिस्ती धर्मांवर बोलून दाखवा.

सनातन धर्माबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तामिळनाडुचे मंत्री उदयनिधी स्ट‌ॅलिन हे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी विरोध केला. तर अनेकांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी आव्हानात्मक भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले की, सनातन धर्मावर बोलून स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांना आव्हान आहे की, इतर धर्मावर म्हणजे इस्लाम, ख्रिस्ती धर्मांवर बोलून दाखवा. (You talk about other religions Devendra Fadnavis s challenge on Sanatan Dharma controversy Udayanidhi Stalin )

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सनातन धर्म ही प्राचीन संस्कृती आहे. खरं तर कोणीही कोणाच्या धर्मावर टीका करू नये. परंतु, दुर्दैवानं सनातन धर्माबाबत वांरवार अशी वक्तव्ये केली जातात. फडणवीस म्हणाले की, इतर धर्मावर म्हणजेच इस्लाम, ख्रिस्ती धर्मावर बोलून दाखवा. त्यावर बोलालं तर हंगामा होईल. म्हणूनचे हे लोक केवळ सनातन धर्मावर बोलतात आणि स्वत: ला धर्मनिरपेक्ष म्हणवतात.

सनातन धर्म संपणार नाही…

- Advertisement -

सनातन धर्म संपावा अथवा संपवून टाकू अशी विधानं जे लोक करतात, त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खडसावून सांगितलं आहे की, सनातन धर्म तर अबाधित राहणार परंतु ज्यांचे विचार सनातन धर्म संपवण्याचे आहेत, त्यांचे विचारच संपून जातील.

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये बीजेपीच

मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये बीजेपीचंच सरकार येईल, असा विश्वासही यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला. तसंच, जनआशिर्वाद यात्रा आणि परिवर्तन यात्रा या दोन्ही यात्रांना भरघोस यश मिळत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

- Advertisement -

(हेही वाचा: सुरक्षा दिली असती तर हल्ला झालाच नसता; सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीची खंत )

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलीन?

उदयनिधी स्टॅलिन यांनी चेन्नई येथे तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी सनातन धर्मातील जातीभेद आणि इतर प्रथांवर टीका केली. त्यांनी धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. सनातन धर्मामुळे समाजात भेदभाव होत असल्याचे ते म्हणाले होते.

- Advertisment -