घरताज्या घडामोडीतुम्ही दहा पावलं चाला मी अकरा पावलं चालतो; पंतप्रधान मोदींची फेरीवाल्यांना साद

तुम्ही दहा पावलं चाला मी अकरा पावलं चालतो; पंतप्रधान मोदींची फेरीवाल्यांना साद

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेरीवाल्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच, 'तुम्ही तुम्ही दहा पावलं चाला मी अकरा पावलं चालतो', असे आश्वासनही यावेळी पंतप्रधाना नरेंद्री मोदी यांनी फेरीवाल्यांना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेरीवाल्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच, ‘तुम्ही तुम्ही दहा पावलं चाला मी अकरा पावलं चालतो’, असे आश्वासनही यावेळी पंतप्रधाना नरेंद्री मोदी यांनी फेरीवाल्यांना दिले. पंतप्रधान स्वनिधी उपक्रमाअंतर्गत फेरीवाल्यांना हे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. फेरीवाल्यांच्या खात्यावर ऑनलाईन दहा हजार रुपये जाणार आहेत. (You walk ten steps I walk eleven Prime Minister Modi’s message to the hawkers)

पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील सभेत भाष्य केले. “पंतप्रधान स्वनिधी योजना ही केवळ फेरीवाल्यांना कर्ज देण्यासाठी नाही, तर त्यांचे आर्थिक बळ वाढवणारी आहे. ही स्वनिधी योजना फेरीवाल्यांसाठी स्वाभिमान आहे. मला सांगण्यास आले की, स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना डिजीटल पेमेंटच्या ट्रेनिंगसाठी सव्व तीनशे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेऊन फेरीवाल्यांनी डिजीटल पेमेंटची सुरूवात केली आहे”, असे पंतप्रधान नरेंद्री मोदी म्हणाले.

- Advertisement -

शिवाय, “हे ऐकून अनेकाना धक्का बसेल की, देशभरातील पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांनी कमी वेळेत जवळपास 50 हजार कोटी रुपयांचे डिजीटल ट्रॅन्झॅक्शन केले आहे. ज्यांना आपण अनाडी समजतो. ज्यांना आपण विविध भाषेतून शिव्या देतो. त्या सर्व फेरीवाल्यांनी मोबाईलवरून 50 हजार रुपयांचे डिजीटल ट्रॅन्झॅक्शन केले. त्यामुळे त्यांचा हा पराक्रम आणि परिवर्तन निराशावादींसाठी मोठे उत्तर आहे. जे आधी सांगत होते की, फेरीवाले कसे डिजीटल ट्रॅन्झॅक्शन करणार? पण हे त्यांचासाठी उदाहरण आहे. तसेच जेव्हा सगळे प्रयत्न करतात, तेव्हा असंभव काहीच नसते. याच प्रयत्नांनी आपण मुंबईला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊ, असेही पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी सांगितले,

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मुंबईतील ३८,००० हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटनं आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या लाईन्सचं त्यांनी लोकार्पण केलं. यावेळी विविध राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले.

- Advertisement -

हेही वाचा – समर्पित प्रशासन असेल तरच शहरातील विकासाला वेग, मोदींनी मुंबईत फोडला प्रचाराचा नारळ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -