घरताज्या घडामोडीकडकनाथ कोंबडी पालन घोटाळा; तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा; तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Subscribe

कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांवर आता आत्महत्येची वेळ येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील तरुण शेतकरी प्रमोद जमदाडे यांनी रयत अॅग्रो संस्थेत अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र सततचा पाठपुरावा करुनही रयत संस्थेकडून पैसे न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून जमदाडे यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. फडणवीस सरकारच्या काळात हा घोटाळा झाला होता, असे बोलले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी सांगलीचा दौरा केला होता. त्यावेळी इस्लामपूर येथे त्यांनी कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करु, असे आश्वासन दिले होते.

पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कडकनाथ घोटाळा झाला आहे. या योजनेत हजारो शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. या व्यवसायासाठी अनेकांनी सावकार आणि इतर माध्यमातून कर्ज घेतले होते. मात्र योजनेतच घोटाळा झाल्यामुळे गुंतवलेले पैसे परत मिळवायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला होता. प्रमोद जमदाडे यांनी देखील अडीच लाखांचे कर्ज काढले होते. कर्जाचा तगादा मागे लागल्यामुळे प्रमोदने विषप्राशन करुन आत्महत्या केली.

- Advertisement -

रयत अॅग्रो कंपनीत जवळपास ८ हजार शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली होती. या सर्वांची फसवणूक झाली आहे. प्रमोद जमदाडेने रयत कंपनीविरोधात अनेकवेळा आंदोलन केले होते. तसेच तो इतर आंदोलकांना एकत्र करण्याचेही काम करत होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -