शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्वीट करणारया तरुण नाशिक मधून ताब्यात

नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद पवार यांच्याविरुद्ध निखिल भामरे नावाच्या तरुणानं आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. या तरुणाविरोधात कारवाई करावी असं ट्वीट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.

यानंतर निखिल भामरेला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आणखी काही आक्षेपार्ह मजकूर निखिलच्या मोबाईलमध्ये आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.