एमपीएसी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तरूणाची आत्महत्या, जळगावमधील घटना

भारती ह्या बुधवारी सकाळपासून महेंद्रला कॉल करत होत्या. मात्र, त्याचा फोन लागत नव्हता. त्यामुळे भारती यांनी त्यांच्या शेजाऱ्यांना काॅल करून घरी जाण्यास सांगितले.  शेजारी घरी गेले असता दरवाजा आतून लावलेला असल्याचे दिसले

sucide
प्रातिनिधिक फोटो

स्पर्धा परिक्षेत (competitive examination) आलेल्या अपयशाचा आता आणखी एक बळी गेला आहे. एमपीएससी (MPSC)  परिक्षेत कमी गुण मिळाल्याने जळगावमधील (Jalgaon) एका तरूणाने आत्महत्या (committed suicide) केली. महेंद्र देविदास पाटील (२२- Mahendra Devidas Patil ) असे या तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी त्याने सुसाईट नोट लिहिली आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्याने म्हटले.

अमळनेर तालुक्यातील आनोरे गावात महेंद्र राहत होता. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी तो जळगाव शहरातील आहुजा नगरात बहिणीकडे जानेवारी महिन्यापासून राहत होता. रविवारी २२ मे रोजी महेंद्रची बहिण भारती आणि मेव्हणे हरेंद्र पाटील आनोरे गावात लग्नासाठी गेले होते. त्याच्या बहिणीने मंगळवारी त्याला फोन केला. मात्र, मोबाईल बिझी असल्यानेत्याच्याशी तिचा संपर्क झाला नाही.  त्यामुळे भारती ह्या बुधवारी सकाळपासून महेंद्रला कॉल करत होत्या. मात्र, त्याचा फोन लागत नव्हता. त्यामुळे भारती यांनी त्यांच्या शेजाऱ्यांना काॅल करून घरी जाण्यास सांगितले.  शेजारी घरी गेले असता दरवाजा आतून लावलेला असल्याचे दिसले. त्यांनी अनेक वेळा दरवाजा ठोठावूनही आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी  पोलीस ठाण्यास फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मागील बेडरूममधील खिडकीचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. यावेळी महेंद्र हा ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात हलविला.

महेंद्रने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे कारण सांगितले. सुसाईड नोटमध्ये त्याने म्हटले की, आई-वडील देवासारखे आहे. जीवन गोल आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले. माझा गोल वेगळा आहे. पण माझ्यासोबत अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. एमपीएससीच्या परीक्षेत मला कमी मार्क पडले. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. सुसाईड नोट पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.