घरमहाराष्ट्रपबजी गेममुळे अजित पवारचं डोकं फिरलं

पबजी गेममुळे अजित पवारचं डोकं फिरलं

Subscribe

पबजी हा जगप्रसिद्ध मोबाईल गेम आहे. या मोबाईल गेममध्ये पराभव झाल्यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्याच्या बऱ्याच घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. याशिवाय पबजी गेममधील पराभव जिव्हारी लागल्यामुळे अनेकजण मनोरुग्ण देखील झाले आहेत. आता पुन्हा एकदा तशाच एका घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. ही घटना चाकण येथे घडली आहे. पबजी गेममधून पराभव झाल्यामुळे चाकणमधील एका तरुणाचं डोकं फिरलं आहे. विशेष म्हणजे या तरुणाचं नाव अजित शिवाजी पवार असं आहे. पबजीमुळे मनोरुग्ण झालेल्या या तरुणाची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडं फिरत आहे. सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. कारण त्या तरुणाचे नाव अजित पवार आहे. मात्र, या अजित पवाराचा राजकारणातील अजित पवारांशी कोणताही संबंध नाही.


हेही वाचा – ‘पबजी’ने घेतला इंजिनिअरचा बळी, श्रीरामपूरमधील धक्कादायक घटना

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

चाकणचा अजित पवारला पबजी खेळण्याचं खूप वेड होतं. हा अजित पवार मुळचा इंदापूर तालुक्यातील टेंभुर्णी गावचा रहिवासी आहे. वारंवार पबजीत पराभव होत असल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम अजितच्या डोक्यावर पडला. तो गेममध्ये दिल्या जाणाऱ्या कमेंट्सचा वापर आपल्या सामान्य आयुष्यात करु लागला. आज त्याने रस्त्यावरती चालताना पबजी गेम खेळताना दिल्या जाणाऱ्या कमेंट्स नागरिकांवर वापरल्या. तरुणाचं डोकं फिरलंय हे लक्षात येताच नागरिकांनी त्याला धरुन चाकण पोलिसांच्या स्वाधीन केला. आता पोलीस या तरुणाचे समालोचन कसे करतात ते पाहावं लागणार आहे.

आजीने पबजी खेळू दिलं नाही म्हणून नातवाची आत्महत्या

दरम्यान, चाकण येथे अजित पवार या तरुणाचं डोकं फिरल्याची बातमी ताजी असतानाच पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात आजीनं पबजी खेळू दिलं नाही म्हणून नातवानं आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या मुलाने मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -