लोणावळ्याच्या नागफणी पॉईटवरून तरुण बेपत्ता, शोध घेणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस

Young missing in Lonavla forest
Young missing in Lonavla forest

लोणावळ्याच्या घनदाट चंगलात नागफणी पॉईट वरून 24 वर्षाचा एक तरुण बेपत्ता झाला आहे. फराण सेराजूद्दीन असे त्या तरुनाचे नाव आहे. तो दिल्ली येथील रहीवासी आहे. हा तरून कामानिमित्त पुण्यात आला होता. तेथून फिरण्यासाठी लोणावळ्यात आला होता. नागफणी पॉईट जाताना तो रस्त्याने गेला होता. मात्र, रस्ता चुकल्यानंतर त्यांने भाऊ आणइ आई वडिलांना फोन मेसेज करून याची कल्पना दिली होती, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

हेही वाचा – मुंबईसह या शहरामध्ये पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू, राज्य सरकारची घोषणा

फरान सेराजुद्दीन हा एका रोबोट कंपनीत अभियंता पदावर काम करतो. तो शुक्रवारी पुण्यात आला होता, तिथून त्याने लोणावळा गाठले. फरान नागफणी पॉईंट येथे एकटाच फिरण्यास गेला. मात्र, तो ज्या रस्त्याने गेला तोच रस्ता चुकला. त्याने तात्काळ भाऊ, आई, वडील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला. याबाबत त्याने माहिती दिली, लोणावळा पोलिसांशी कुटुंबीयांनी संपर्क साधला. मात्र, तोपर्यंत फरानचा मोबाईल बंद झाला होता. अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे. तीन दिवसांपासून फरान बेपत्ता झाला आहे. दरम्यान त्याला शोधणाऱ्याला १ लाखांचे बक्षीस कुटुंबीयांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा – BEST Electric Bus : बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बस दाखल होणार

त्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन लोणावळा पोलीसांपुढे आहे. पोलीस पथक त्याचा शोध घेत असून त्यांच्या सोबत कुकुंडी गाव चे ग्रामस्थ, तरुण आहेत. डॉग स्कॉड, एटीएस स्टाफ, ड्रोन कॅमेऱ्याद्वारे, रेक्यु टीम खोपोली, शिवदुर्ग हे सर्व त्याचा शोध घेत आहेत. मात्र, जंगल आणि खोल दरी असल्यामुळे त्याचा शोध घेणे कठीन जात आहे.