घरताज्या घडामोडीऔरंगाबादमध्ये रिक्षाचालकाच्या छेडछाडीमुळे तरुणीने घेतली धावत्या रिक्षातून उडी

औरंगाबादमध्ये रिक्षाचालकाच्या छेडछाडीमुळे तरुणीने घेतली धावत्या रिक्षातून उडी

Subscribe

'रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीची छेड रिक्षावाला काढतो...कुठून मिळतयं हे बळ विकृतांना... पोलिसांची भिती राहिलेली नाही', अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

औरंगाबादमधून (Aurangabad)  एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षातून (auto rickshaw ) जाणाऱ्या एका तरुणीची रिक्षाचालकाडून छेडछाड करण्यात आली. आपला जीव वाचवण्यासाठी तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारली. यात तरुणीची गंभीर जखमी झाली आहे. तिच्या तोंडाला गंभीर दुखापत झालीय. (young woman jumped out of auto rickshaw due to harassment by rickshaw puller in Aurangabad)  एक महाविद्यालयीन तरुणी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास  ट्यूशनला जाण्यासाठी जालना रोडवर मोंढा नाका येथून रिक्षात बसली. तरुणी रिक्षात एकटी असल्याचे पाहून रिक्षाचालकाने तिची छेड काढण्यास सुरुवात केली. तरुणीने आरडा ओरडा करुन रिक्षा थांबवायला सांगितले परंतु रिक्षाचालकाने तिचे ऐकले नाही. अखेर चालत्या रिक्षातून खाली उडी मारुन तरुणीने नराधम रिक्षाचालकाच्या ताब्यातून आपला जीव वाचवला.

रिक्षातून उडी मारल्याने तरुणीच्या तोंडाला आणि हाता पायांना गंभीर दुखापत झाली. तरुणी रिक्षातून पडल्याचे पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोक तिच्या मदतीसाठी धावले. तरुणीची अवस्था पाहून तिला धीर देत तिच्या कुटुंबियांना बोलावले. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार केल्यानंतर तरुणीची प्रकृती स्थीर आहे तिला सध्या घरी पाठवण्यात आले असून पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

या घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून आता मुलींना घराबाहेर पडायचे की नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीची छेड रिक्षावाला काढतो…कुठून मिळतयं हे बळ विकृतांना… पोलिसांची भिती राहिलेली नाही’, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे. सुदैवाने मुलगी बचावली आहे तिच्या तोंडाला मार बसलाय औंरगाबादचे पोलीस आयुक्त अँक्शन मोडमध्ये येण्यासाठी कोणाची वाट पाहत आहेत? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी केलाय.

- Advertisement -

घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती

ही तरुणी सकाळी ट्यूशनला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. ९:३० वाजताच्या सुमारास तिने रिक्षा पडकली होती. दुर्दैवाची बाब म्हणजे त्या तरुणीचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशीवर तिच्यावर हे अरिष्ट ओढावले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्यात तरुणी भयंकररित्या रिक्षातून खाली पडताना दिसत आहे. या व्हिडिओतून या घटनेची तीव्रता समोर येतेय.


हेही वाचा – शिवसेनेतील नाराज आमदार माझ्या संपर्कात, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -