घरमहाराष्ट्रबिबट्याने नव्हे, तरुणांनी केला बिबट्याचा पाठलाग

बिबट्याने नव्हे, तरुणांनी केला बिबट्याचा पाठलाग

Subscribe

वनविभागाकडून हुल्लडबाज तरुणांचा तीव्र निषेध

सांगलीच्या कवठे महांकाळमधील अलकुड एम भागातील डोंगरावर बिबट्याचे दर्शन झाले. दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास याठिकाणी डोंगराच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर नागरिकांची एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पण नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली नाही, तर काही तरुणांनी कुत्र्यांसह बिबट्याचा पाठलाग करत हुल्लडबाजी केल्याचेही दिसून आले.

हा बिबट्या उसाच्या शेतामध्ये लपला असून वनविभागाचे अधिकारी त्याला संरक्षित क्षेत्रात पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हुल्लडबाजांनी केलेल्या प्रकारामुळे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. बिबट्या माघारी फिरला असता आणि त्याने कोणावर हल्ला केला असता तर प्राण गमवण्याची वेळ आली असती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -