Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तुमच्या शुभेच्छांमध्ये सकारात्मक ऊर्जा, अमित ठाकरेंनी कोरोनामुक्तीनंतर मानले शुभेच्छुकांचे आभार

तुमच्या शुभेच्छांमध्ये सकारात्मक ऊर्जा, अमित ठाकरेंनी कोरोनामुक्तीनंतर मानले शुभेच्छुकांचे आभार

शुभेच्छांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र व मनसेचे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमित ठाकरे यांना सौम्य ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे मंगळवार २० एप्रिल रोजी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमित ठाकरेंचा कोरोना अहवाल नकारात्क आल्याने त्यांना रुग्णालयातू घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयातून घरी आल्याची माहिती अमित ठाकरे यांनी ट्विट करुन दिली आहे. अमित ठाकरे पुढील काही दिवस होम क्वारंटाईन राहणार आहेत. तसेच त्यांनी शुभेच्छा देणाऱ्यांचे ट्विट करत आभार मानले आहेत.

तुम्ही सर्वांनी काळजी घ्या – अमित ठाकरे

कोरोनावर यशस्वी मात केल्यावर लीलावती रुग्णालयातून अमित ठाकरे घरी परतले आहेत. यानंतर त्यांनी आपण घरी परतलो असून प्रकृती उत्तम असल्याचे ट्विट करत सांगितले आहे. अमित ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, शुभेच्छांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते, याचा अनुभव मी नुकसात घेतला आहे, मी हॉस्पिटलमधून घरी परतलोय आणि माझी तब्येत चांगली आहे. दक्षता म्हणून पुढचा एक आठवडा होम क्वारंटाइन म्हणजेच घरातच असेन. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक आभार तसेच तुम्ही सर्वांनीही काळजी घअया आणि सुरक्षित राहा असे आवाहन देखील अमित ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisement -

मनसे नेते अमित ठाकरे यांना सौम्य ताप व सर्दी होती त्यामुळे खबरदारी म्हणून कोरोना चाचणी केली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २० एप्रिलपासून कोरोनावर उपचार घेऊन अमित ठाकरेंनी पाच दिवसात कोरोनावर मात केली आहे. पुढील १५ दिवस ते होम क्वारंटाईन राहणार आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार ते पुढील काही दिवस घरीच विश्रांती घेणार आहेत.

- Advertisement -