Mumbai Crime : धक्कादायक! लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीवर चाकूने हल्ला

मुंबईमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील वडाळा या परिसरात घडली आहे. लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर धारदार चाकूने हल्ला केला आहे. तसेच तरूणीला प्रियकराच्या जीवघेण्या हल्ल्यापासून वाचवताना एक पोलीस जखमी झाला आहे. मात्र, तरूणीला वाचवण्यात पोलिसांना यश आलं असून आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

मुंबईतील वडाळा येथील बरकत अली परिसरात एक तरुणी कामावर जाण्यासाठी पायी चालत जात होती. त्यावेळी अनिल बाबर, वयवर्ष (३१) यानं तिचा पाठलाग केला आणि सानिका रस्ता ओलांडत असताना त्यानं तिच्यावर चाकूनं पाठीवर हल्ला केला. हा सर्व प्रकार वडाळा परिसरात तैनात असणाऱ्या वडाळा पोलीस ठाण्याचे अंमलदार मयुर पाटील यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न देखील केला. यामध्ये आरोपी अनिल पाटीलने आपला जीव वाचवण्यासाठी पोलिसांवर देखील हल्ला केला. मात्र, त्याचा प्रयत्न फोल ठरला. त्यावेळी तरुणीला वाचवण्यासाठी वडाळा पोलीस ठाण्याचे अंमलदार मयुर पाटील यांनी धाव घेतली. पोलिसांना तरूणीला वाचवण्यात मोठं यश मिळालं असून त्यांनी आरोपीला देखील अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूण आणि तरूणी ऐकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. त्यांचे प्रेमसंबंध देखील होते. परंतु तरूणीच्या आई-वडिलांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या रागातून प्रियकरानं पीडितेवर धारदार चाकूनं हल्ला केला.या तरूणीचं नाव सानिका असं आहे.

पोलिसांनी तात्काळ आरोपी अनिलला पकडून जखमी तरूणीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास बरकत अली नाका परिसरात हा थरारक प्रकार घडला.


हेही वाचा : सध्या पक्ष स्थापना नाही, आधी जनतेचे प्रश्न समजून घेणार – रणनीतीकार प्रशांत किशोर