घरताज्या घडामोडीउमराणे येथे तरुणाची आत्महत्या; फेसबुकवर पोस्ट केली सुसाईड नोट

उमराणे येथे तरुणाची आत्महत्या; फेसबुकवर पोस्ट केली सुसाईड नोट

Subscribe

देवळा : पत्नी प्रियकाराबरोबर पळून गेल्याने उमराणे येथील २७ वर्षीय तरुणाने फेसबुकवर सुसाईड नोट टाकून राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने उमराणे सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १६) उमराणे येथील राहुल चव्हाण या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

तत्पूर्वी त्याने आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर यासंदर्भात सुसाईड नोट पोस्ट केली होती. त्यात म्हटल्याप्रमाणे राहुलची पत्नी व कल्पेश सूर्यवंशी (रा. मुंगसे) यांचे प्रेमसंबंध होते. शनिवार (दि. १३)पासून राहुलची पत्नी आपल्या चार वर्षीय मुलाला व राहुल याला सोडून या व्यक्तीसोबत घर सोडून निघून गेली होती. त्यामुळे समाजात आपली मोठी बदनामी झाली आहे, आपण कुणालाही तोंड दाखवू शकत नाही या कारणाने नैराश्यापोटी राहुलने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला तर सुसाईड नोटच्या आधारावर पत्नी व तिचा प्रियकर कल्पेश यांच्याविरोधात आत्महत्तेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर करत आहेत. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने उमराणे सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -