Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र इंधन दरवाढ युवक काँग्रेस आक्रमक; मोदींच्या बॅनरला काळे फासले

इंधन दरवाढ युवक काँग्रेस आक्रमक; मोदींच्या बॅनरला काळे फासले

Subscribe

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे महगाईमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जनता या दरवाढीत होरपळून जात असताना केंद्र सरकारने मात्र तात्पुरती मलमपट्टी करत जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकाला काळे फासत दरवाढीचा निषेध केला आहे. काँग्रेसकडून पहिल्यांदाच आक्रमक पवित्रा घेत अशाप्रकारे आंदोलन केले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत कमी केलेल्या इंधनाच्या किंमती पुन्हा हळू हळू वाढविण्यात येत आहेत. सामान्य जनतेला दार कपातीचा कुठलाही फायदा झाल्याचे दिसून येत नाही. भाजप सरकार सत्तेत आल्यापासूनच जनतेला लॉलीपॉप देत असल्याचा आरोप युवक काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.

Satyajeet Tambe protest against Modi government1
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे

- Advertisement -

युवक काँग्रेसच्यावतीने आज राज्यभरात इंधनाच्या दरवाढीचा निषेध करण्यात आला. पेट्रोल पंपावर आंदोलन करताना पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना लॉलीपॉप वाटप करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली ५ रुपयांची कपात हि फसवी असल्याचा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे. अजूनही इंधन दरवाढ सुरु असून सर्वसामान्य जनतेला कुठलाच फायदा झाला नसल्याचे दिसून येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार सत्तेत आल्यापासून जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोपही यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -