घरमहाराष्ट्रक्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचा मृत्यू

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचा मृत्यू

Subscribe

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा खेळाडू फलंदाजी करुन मैदानाच्या कडेला सामना पाहत बसला होता. यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला.

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटाना रविवारी पिंपरी-चिंचवडच्या हिंजवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. वसीम अजीज मुलाणी असं या ३२ वर्षीय तरुणाचं नाव होतं. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला ताबडतोब परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान वसीमचा मृत्यू झाला.

कंपनीने आयोजित केली होती स्पर्धा

हिंजवडी परिसरातील कासारसाई येथील क्रिकेट मैदानावर मयत वसीम काम करत असलेल्या कंपनीने क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती.सायंकाळी चारच्या सुमारास स्पर्धेचा शेवटचा क्रिकेट सामना सुरू झाला. वसीम फलंदाजी करुन मैदानाच्या कडेला बसला होता. क्रिकेट सामना पाहात असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. मैदानात रुग्णवाहिका आणि डॉक्टर होते. त्यांनी वसीम यांना तातडीने वाकड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान,मृत्यू चे कारण स्पष्ट होत नव्हतं. वसीम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आलं. तेव्हा त्यांचा मृत्यू हा हृदय विकाराचा झटक्यानं झाल्याचे स्पष्ट झालं. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार पशाले हे करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -