घर महाराष्ट्र धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू

Subscribe

रेल्वेतून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. मयत तरुण हा घरातील ऐकमेव कमावता व्यक्ती असल्याने कुटुंबाचा आधार हरवला आहे.

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. प्रकाश दत्तराम नारे अस मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता, त्याच्या मृत्यू ने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमी अवस्थेत प्रकाश ला पिंपरी-चिंचवड यशवंराव स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

मुंबईती हॉटेलमध्ये होता नोकरी

प्रकाश दत्तराम नारे हा मूळचा नांदेड (नायगाव) येथील रहिवासी असून तो मुंबई मधील एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता. मिळालेल्या पगारात तो वृद्ध आई आणि लहान भावाचा सांभाळ करायचा. मयत प्रकाश रविवारी मुंबईहून पुण्यात काही कामानिमित्त आला होता. चिंचवड येथील चुलत भावाच त्याच्याशी रात्री उशिरा फोनवर बोलणं झालं होतं, घरी जेवायला ये आणि भेटून जा अस चुलत भाऊ म्हटला होता, मात्र इतर काम असल्याने येत नसल्याचे प्रकाश ने सांगितले होते. सोमवारी सकाळी आठ च्या सुमारास त्याने पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढले रेल्वे पिंपरी रेल्वे स्थानकाच्या जवळ येताच त्याचा तोल गेला आणि प्रकाश धावत्या रेल्वेतून थेट खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला त्याला तातडीने यशवंराव स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा दुपारी उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खिशात मिळालेल्या कागदपत्रांवरून ओळख पटवण्यात आली असून चुलत भावाला बोलावून मृतदेह मूळ गावी म्हणजेच नांदेड येथे नेण्यात आला आहे. आपला हसता खेळता कमावता मुलगा गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. घटनेमुळे नांदेड (नायगाव) या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -