घरमहाराष्ट्र'तरूणांनो, सामाजिक भूमिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंप्रमाणेच असूद्या'

‘तरूणांनो, सामाजिक भूमिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंप्रमाणेच असूद्या’

Subscribe

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने मानवहीत लोकशाही पक्षाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.

”लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जगाला समतेचे विचार दिले. त्यामुळे तुमची राजकीय भूमिका काही असो पण सामाजिक भूमिका ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भूमिकेशी बांधील असावी,” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तरुणांना केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सांगलीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सांगली जिल्ह्याचे सुपूत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने मानवहीत लोकशाही पक्षाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी अभिवादन सभा पार पडली. त्यावेळी उपस्थितांना शरद पवार यांनी संबोधित केले.

Youth, Do social work like Annabhau Sathe - Sharad Pawar
वाटेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

येथे येऊन खूप आनंद झाला

”जगभरात श्रमिक, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर ज्या साहित्यिकांनी भाष्य केले त्यांच्या यादीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव आग्रहाने घेतले जाते,” असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले की, ”राजारामबापू आणि अण्णाभाऊ साठे दोन्ही दिग्गजांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे या परिसरात उपस्थित राहत असताना अत्यंत आनंद झाला. या दोन्ही सुपुत्रांनी आपल्या मातीसाठी काम केले,” असेही शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मातंग समाजासाठी एक लाख घरे देण्यात येणार’

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची महती

यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची महती सांगताना शरद पवार म्हणाले की, ”अण्णाभाऊ साठे हे उपेक्षित समाजात जन्माला आले. उपेक्षित समाजाच्या वेदना आणि समस्या त्यांनी आपल्या लेखणीतून मांडल्या. त्यांनी केवळ वेदना मांडल्या नाही तर त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केला,” असेही सांगितले. महात्मा फुले, शाहूमहाराज, कार्ल मार्क्स हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आदर्श होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या स्थान आणि पदाचा वापर समाजातील तळागाळातील लोकांच्या फायद्यासाठी केला,” असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -