घरताज्या घडामोडीप्रजासत्ताक दिनी न्यायहक्कासाठी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न; वाचा नेमके प्रकरण काय?

प्रजासत्ताक दिनी न्यायहक्कासाठी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न; वाचा नेमके प्रकरण काय?

Subscribe

देशात ७४व्या प्रजासत्ताक दिनाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे देश प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आनंदोत्सव साजरा करत असताना, दुसरीकडे मात्र दोघा जणांनी आपल्या न्यायहक्कासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

देशात ७४व्या प्रजासत्ताक दिनाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे देश प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आनंदोत्सव साजरा करत असताना, दुसरीकडे मात्र दोघा जणांनी आपल्या न्यायहक्कासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील एका तरुणाने मंत्रालयासमोर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला तर, सोलापूर शहरातील जिल्हा कृषी कार्यालयासमोर युवा भीम सेनेच्या पदाधिकाऱ्यानेही आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. (youth from beed attempted killed him self in front of the mantralaya on republic day mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील सुरेश मुंडे नावाच्या माजी सैनिकाने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी उपस्थित मरीन ड्राइव्ह पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत सुरेश मुंडेला ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अर्नथ टळला. सुरेश मुंडे हे माजी सैनिक असून बीडचा रहिवाशी आहे.

- Advertisement -

बीड पोलीस फसवणूक प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याने या माजी सैनिकाने मंत्रालयासमोर आत्महत्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरेश मुंडे हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू केली जात आहे.

त्याशिवाय, सोलापूरच्या जिल्हा कृषी कार्यालयासमोर युवा भीम सेनेच्या पदाधिकाऱ्यानेही आत्मदहनाचा प्रयत्न केला. या पदाधिकाराच्या आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर जिल्हा कृषी विभागाने बोगस खत कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युवा भीम सेनेकडून देण्यात आला. दरम्यान, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी मध्यस्थी करून ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विविध मागण्यांसाठी अकृषी विद्यापीठ, कॉलेज कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची हाक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -