अमोल मिटकरींना युवकांनी दिले टरबूज भेट, धरला होता कापण्याचा हट्ट

amol mitkri

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मिटकरी यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र, एक वेगळी भेट त्याना देण्यात आली आहे. त्यांना युवकांनी थेट टरबूज भेट दिला आहे. या गोष्टीवरुन सोशल मीडियात चर्चा सुरू आहे.

टरबूज कापण्यास दिला नकार – 

वाढदिवसाला कुठला केक न कापता हे टरबूज कापण्यात यावे, असा हट्ट युवकांनी धरला होता. मात्र, सद्यस्थीतीत राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी या टरबूजा मुळेच घडत आहेत, असा टोला यावेळी अमोल मिटकरी यांनी हसत हसत लगावला. त्यामुळे आपण हे टरबूज कापणार नाही. मात्र, आपण आणलेल्या गिफ्टचा मान ठेवत हे टरबूज स्वीकारतो आहे, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी या युवकांकडून ‘टरबूज’ स्वीकारले.

 

हनुमान चालिसाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला होता. त्यावेळी भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सभेत हनुमान चालिसेच्या दोन ओळी सांगत राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. मात्र, फडणवीस यांनी हनुमान चालिसाचा अर्थ समजून घ्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला होता. फडणवीस यांनी हनुमान चालिसेचा चुकीचा अर्थ सांगितल्याचा दावा केला होता.