घरताज्या घडामोडीभारतातील तरुणांच्या आत्महत्या प्रतिबंध राष्ट्रीय सल्लागार परिषदमध्ये महाराष्ट्राच्या युवांची निवड

भारतातील तरुणांच्या आत्महत्या प्रतिबंध राष्ट्रीय सल्लागार परिषदमध्ये महाराष्ट्राच्या युवांची निवड

Subscribe

भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. साठ टक्के ही युवा पिढी भारताच्या लोकसंख्या मध्ये सामील होते. देशातील युवक हा विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे पण, त्याचा बरोबर आपल्या देशाला तरुणांच्या आत्महत्या या प्रश्नाने ही ग्रासले आहे.

मुंबई : भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. साठ टक्के ही युवा पिढी भारताच्या लोकसंख्या मध्ये सामील होते. देशातील युवक हा विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे पण, त्याचा बरोबर आपल्या देशाला तरुणांच्या आत्महत्या या प्रश्नाने ही ग्रासले आहे. भारताचा युवांच्या आत्महत्येमध्ये जगात ४३वा नंबर लागतो. तरूणांच्या एक लाख लोकसंख्येमागे युवक ३४ तर युवती ८० आत्महत्या करतात, असा जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी आहे. (Youth of Maharashtra selected for National Advisory Council on Youth Suicide Prevention in India)

यांच विषयावर जागतिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या युवकांची देशभरातून भारतातील तरुणांसाठी आत्महत्या प्रतिबंधाला प्राधान्य देणे या विषयावरील राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीत शिक्षण मंत्रालय, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण भारत सरकार व म्.च्.आय, मुंबई यांच्या वतीने दिल्ली येथे ४ व ५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी, विनायक हेगाणा या महाराष्ट्रातून एकमेव युवकांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

विनायक मागील 8 वर्षांपासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी पदवीधर शिक्षण घेवून मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात उविरतपणे काम करत आहे. शिवार संसद युवा चळवळ उभी करून ३००० शेतकरी कुटुंबातील युवकांची फौज उभी केली आहे. आत्महत्या होऊच नये यासाठी “शिवार हेल्पलाइन” या संशोधनपर संकल्पनेतून आतापर्यंत १९५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यास यश आले आहे. याची राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून विद्यापीठ स्तरावर, टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स, मुंबई, आय.आय.टी मुंबई व निती आयोग भारत सरकार मार्फत ही दखल घेण्यात आली आहे.

जगातील १८ देशातून ३२ युवकांमध्ये जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या(UNDP) अंतर्गत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल (SDG) ग्लोबल चेन्जमेकर फेलोशिप देवून गौरविण्यात आले आहे. विनायकने आतापर्यंतच्या मानसिक आरोग्य व आत्महत्या या विषयावरील योगदानामुळे या राष्ट्रीय सल्लागार परिषदेत तो मार्गदर्शन करणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेना-धनुष्यबाणाची लढाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरणार भाई?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -