Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 30 वर्षीय युवासेना सचिव दुर्गा भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

30 वर्षीय युवासेना सचिव दुर्गा भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Subscribe

ऐन तरुण वयात हृदयविकाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नुकताच युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अवघ्या 30व्या वयात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्याने दुर्गा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ऐन तरुण वयात हृदयविकाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नुकताच युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे (Durga Bhosale) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अवघ्या 30व्या वयात त्यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आला. बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्याने दुर्गा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे समजते. (Youth Sena Secretary Durga Bhosle passed away due to heart attack at the age of 30)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणावरुन ठाकरे गटाने ठाण्यात बुधवारी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांनीही सहभाग घेतला होता. त्यावेळी मोर्चादरम्यान झालेल्या घटनेचा दुर्गा भोसले या घोषणा देत विरोध करत होत्या.

- Advertisement -

घोषणा देत असतानाच दुर्गा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे इतर युवासेनेच्या कार्यकर्तांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी आणि विश्रांतीसाठी दुर्गा यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. दुर्गा भोसले यांना अचानक आलेल्या हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दुर्गा भोसले यांच्या मागे पति, आई आणि वडील केशवराव भोसले, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, आज दुर्गा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दक्षिण मुंबईतल्या पेडल रोड येथील जसलोक रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या कंबाला हिलमधील त्यांच्या राहत्या घरातून अंतयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमी संध्याकाळी ५ वाजता अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, व्यायाम करताना, खेळताना, चालताना अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


हेही वाचा – वाळूचा लिलाव बंद, डेपोतूनच होणार विक्री; राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय

- Advertisment -