घरमहाराष्ट्ररेल्वेसमोर उडी मारुन तरुणाची आत्महत्या

रेल्वेसमोर उडी मारुन तरुणाची आत्महत्या

Subscribe

या घटनेनंतर तरुणाचा चेहरा विदृप झाला आहे. त्याचे कपडे देखील फाटले आहेत. त्यामुळे या तरुणाची ओळख अध्यापही पटलेली नाही.

हिंगोलीमध्ये एका तरुणाने रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली आहे. उडी मारल्यानंतर तरुणाच्या देहाचे दोन तुकडे झाले आहेत. ही घटना अकोला-पूर्णा लोहमार्गावरील उघडा नदीजवळ घडली आहे. घटनास्थळापासून जवळच वसमत रेल्वे स्थानक आहे. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेत तरुणाचा चेहरा विदृप झाला आहे. त्याचे कपडे देखील फाटले आहेत. त्यामुळे या तरुणाची ओळख अध्यापही पटलेली नाही.

हेही वाचा – महिला डॉक्टरच्या मुलीची आत्महत्या

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

रविवारी दुपारी एका अज्ञात तरुणाने धावत्या रेल्वे समोर उडी मारली आहे. धावत्या रेल्वसमोर उडी मारल्यामुळे त्याच्या शरीरावरुन रेल्वे गेली. यात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. यामुळे त्याच्या शरीराचा अर्धा भाग ४० ते ५० फूट फरकटत गेला. या घटनेनंतर तेथील परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांनतर पोलिसांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. पोलिस ताबोडतोब घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमतच्या उप-जिल्हा रुग्णालयात पाठवले. या घटनेमध्ये तरुणाचा चेहरा विद्रुप झाला आहे. त्याचबरोबर पोलिसांना ओळखीची पुरावा म्हणून काहीच सापडलेले नाही. त्यामुळे तरुणाची अध्यापही ओळख पटलेली नाही.

हेही वाचा –गेम खेळायला मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -