युट्यूबच्या मदतीने अल्पवयीन मुलीने स्वतःच केली प्रसुती?; बाळाचा मृत्यू

या अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर एक मुलासोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. एक दोन महिने चॅट केल्यानतर मुलाने तिला भेटायला बोलावले. तेव्हा त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. ३ मार्च रोजी त्या मुलीची प्रसुती झाली. त्यावेळी ही मुलगी घरात एकटीच होती.

गर्भवती महिला

 

नागपूरः सोशल मीडियामुळे संपूर्ण जग एका क्लिकवर उपलब्ध होते. सोशल मीडियाचे जसे फायदे तसे तोटेही समोर आले आहेत. नागपूर येथे सोशल मीडियामुळे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलीने यु-ट्यूब बघून स्वतः स्वतःची प्रसुती केली, असे सांगण्यात येत आहे. यात बाळाचा मृत्यु झाला आहे. पोलीस याची चौकशी करत आहेत.

या अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर एका मुलासोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. एक दोन महिने चॅट केल्यानतर मुलाने तिला भेटायला बोलावले. तेव्हा त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. ३ मार्च रोजी त्या मुलीची प्रसुती झाली. त्यावेळी ही मुलगी घरात एकटीच होती. आई घरी आल्यावर प्रकृती ठिक नसल्याचे तिने सोगितले. त्यानुसार तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिची प्रसुती झाल्याचे स्पष्ट झाले. प्रसुतीत बाळाचा मृत्यु झाला आहे. पोलिसांनी बाळाच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करुन घेतली आहे. पोलीस त्या मुलाचा शोध घेत आहेत.

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पीडित मुलीचे वय १५ वर्षे आहे. प्रसुती झाली तेव्हा घरात कोणी नव्हते. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकर समोर आला आहे. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला आहे. या जबाबाच्या आधारावर पोलिसांनी तरुणाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तरुण फरार आहे. पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत.

अल्पवयीन मुलीने यु-ट्यूब बघून प्रसुती केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. लवकरात लवकर तरुणाला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. प्रसुतीनंतर बाळाचा संशयास्पदरित्या मृत्यु झाला आहे. त्यामुळे पोलीस याची कसून चौकशी करत आहेत.

सोशल मीडियामुळे मध्यंतरीच्या काळात अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याचे प्रकारही घडले. नवनवीन मोबाइल गेमही मुलांसाठी धोकादायक असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. त्यात आता यु-ट्यूब बघून अल्पवयीन मुलीने स्वतःच प्रसुती केल्याचे बोलले जात आहे.