घरताज्या घडामोडीमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिकरोड तुरुंगात मृत्यू

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिकरोड तुरुंगात मृत्यू

Subscribe

संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला युसुफ अब्दुल रज्जाक मेमन (५५) याचा शुक्रवारी (दि.२६) नाशिक मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी युसुफ अब्दुल रज्जाक मेमन हा एक होता. तो दोन वर्षांपासून शिक्षा भोगत होता. शुक्रवारी (दि.२६) सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ब्रश करत असताना तो चक्कर येवून पडला. ही बाब कारागृह प्रशासनाच्या लक्षात येताच त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. त्याची २०१८ मध्ये औरंगाबाद कारागृहातून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सुरुवातीला तो मुंबईतील आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होता. कुख्यात टायगर मेमनचा तो भाऊ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -