“ज़बाँ को बंद करें या मुझे…”; नवाब मलिकांचा शायरीतून सूचक इशारा

Nawab Malik informed 7 thousand 713 unemployed get Job in January
Nawab Malik informed 7 thousand 713 unemployed get Job in January

एनसीबीच्या ड्रग्ज कारवायांवरुन खळबळ उडवून देणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सूचक ट्विट केलं आहे. माझं तोंड बंद करु शकता पण माझ्या विचारांना बेड्या घालू शकत नाही, असा सूचक इशारा नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

नवाब मलिक आणि भाजपचे मोहित भारतीय यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यात मोहित भारतीय यांनी ट्विट करत मलिकांना डिवचलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक नवीन वर्ष जेलमध्ये साजरं करणार. २०२२ साठी घरुन डब्बा मागवा, असं ट्विट मोहित भारतीय यांनी केलं आहे.

या ट्विटनंतर नवाब मलिक यांनी देखील ट्विट करत सूचक इशारा दिला आहे. माझं तोंड बंद कराल, पण माझ्या विचारांना तुम्ही बेडीत अडकवू शकत नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. “ज़बाँ को बंद करें या मुझे असीर करें, मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते,” असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.

दरम्यान, आज नवाब मलिक यांची दुपारी २ वाजता पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत मलिक कोणता मोठा गौप्यस्फोट करणार आहेत, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.

तसंच, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील पत्रकार परिषद आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ते नेमका कोणता बॉम्ब फोडणार आहेत, याकडे देखील राज्याचं लक्ष लागलं आहे.