घरमहाराष्ट्र'मातोश्री'च्या अंगणातच 'मविआ'त धुसफूस; लसीकरण केंद्रातील गर्दीवरुन झिशान सिद्दिकींचा सेनेला सवाल

‘मातोश्री’च्या अंगणातच ‘मविआ’त धुसफूस; लसीकरण केंद्रातील गर्दीवरुन झिशान सिद्दिकींचा सेनेला सवाल

Subscribe

मातोश्रीच्या अंगणातच महाविकास आघाडीमध्ये धुसफूस निर्माण झाली आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी एक ट्विट करत लसीकरण केंद्राचं उद्घाटन करताना शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या गर्दीवरून टीका केली आहे. कोरोना काळात शिवसेना नेते लसीकरण केंद्रावर गर्दी कसे करतात, असा सवाल झिशान सिद्दिकी यांनी केला आहे.

वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेचे नेते लसीकरण केंद्राचं उद्घाटन करतानाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत. कोरोना काळात शिवसेना नेते लसीकरण केंद्रावर गर्दी कसे करतात? असा सवाल झिशान सिद्दिकी यांनी केला आहे. “राज्यात सगळीकडे कलम १४४ लागू करण्यात आलेलं असताना शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मात्र लसीकरण केंद्राच्या उद्घाटनासाठी गर्दी करत असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे. लॉकडाऊनचे नियम फक्त सर्वसामान्यांना, शिवसेना नेत्यांना लॉकडाऊनचे नियम नाहीत का? असा सवाल सिद्दिकी यांनी केला आहे. तसंच लसीकरण केंद्रामध्ये केवळ एकाला लस दिली जात आहे. मात्र अनेक लोकं फोटो काढत असल्याचं म्हणत त्यांनी या सोहळ्यावर टीका केली आहे. सिद्दिकी यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री कार्यालय, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेला टॅग केलं आहे.

- Advertisement -

शिवसेना आणि झिशान सिद्दिकी यांच्यात याआधीही वाद

सिद्दीकी यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पूर्वमध्ये काही दिवसांपूर्वी एका लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. मात्र, या केंद्राचं उद्घाटन करताना प्रोटोकॉल असूनही स्थानिक आमदार म्हणून सिद्दिकी यांना बोलावण्यात आलं नव्हतं. त्यावर झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानं त्यांनी परब यांनाही सुनावल्याचं पाहायला मिळत होतं.

- Advertisement -

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -