घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजिल्हा परिषद इमारतीची सुरक्षा ‘रामभरोसे’; अधिकारी म्हणतात "आग लावली तर लागेल" अग्निशमन...

जिल्हा परिषद इमारतीची सुरक्षा ‘रामभरोसे’; अधिकारी म्हणतात “आग लावली तर लागेल” अग्निशमन यंत्रणा

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या अग्निशमन यंत्रणेची मुदत संपूनही ती बदलण्याची तसदी घ्यायला बांधकाम विभाग तयार नसल्याने समोर आले आहे. यामुळे आचिा प्रसंग उद्भवल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंबंधी निर्ढावलेल्या अन् सुस्तावलेल्या बांधकाम विभागाचा अजबगजब अनुभव दैनिक आपलं महानगरला आला. अग्निशमन यंत्रणेची मुदत संपल्याच्या पार्श्वभूमीवर दैनिक आपलं महानगरने बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी गुरुवारी (दि.6एप्रिल) छायाचित्रासह बातमी छापली. याचसोबत सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंतांना यांना सोमवारी (दि.10 एप्रिल) भेटून यासंबंधी माहितीही दिली.

यावर उपअभियंता यांना त्वरीत अग्निशमन यंत्रणा बदलण्याचे आदेश देतो असे बांधकाम 1 च्या कार्यकारी अभियंता यांनी दैनिक आपलं महानगरला सांगितले. मात्र पुढील 8 दिवसांत कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाल्याचे दिसले नाही.
तत्राभ, दैनिक आपलं महानगरने बुधवारी (दि.19) पुन्हा बांधकाम अभियंत्यास भेटून अग्निशम यंत्रणेची मुदत संपली असून जर आग लागल्याचा प्रसंग उद्भवल्यास संकटाला तोंड कसे देणार असा प्रश्न विचारला असता आग लावली तर लागेल असे उत्तर या अभियंता महाशयांनी दिले. दैनिक आपलं महानगरने आग कुणी कशाला लावेल? अग्निशमन यंत्रणेची मुदत संपली आहे. आपण त्वरेने कार्यवाही करावी असे सुचविले असता अग्निशमन यंत्रणेचे टेंडर काढावे लागेल असे उत्तर या अभियंता महाशयांनी दिल्याने आजुबाजूला बसलेल्या ठेकेदारांच्याही आश्चर्यात भर पडली.

- Advertisement -

मागील वर्षी याच जागेवर बसलेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या ही बाब लक्षात आणुन दिली असता त्यांनी एका दिवसांत यंत्रणा बदलली असे या अभियंता महाशयांच्या लक्षात आणुन दिले असता सध्या माझा मोबाईल स्विच आॅफ झाला आहे मी नंतर त्यांना सांगतो असे उत्तर या अभियंता महाशयांनी दिले. यावरुन या अभियंता महाशयांना इमारतीच्या सुरक्षेची किती आणि कशी काळजी आहे हे समोर बसलेल्या सर्वांच्याच लक्षात आले. दैनिक महानगरने आपली कर्तव्यपुर्ती केली मात्र इमारतीच्या सुरक्षेची तसूभरही काळजी नसलेल्या या अभियंत्याच्या बेफिकिरीमुळे कुणाचा जीव गेला तर जबाबदार कोण हा प्रश्न निरुत्तरीतच आहे.

उघड्या इलेक्ट्रीक वायरींच्या जाळ्यापासून धोका

जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाकडून कृषी विभागाकडे जातांना जिन्याजवळ जुन्या इलेक्ट्रीक वायरींचे जाळे उघड्या स्वरुपात पहायला मिळते. वायरींचे जाळे जुनाट असल्याने यापासून धोका उत्पन्न होण्याचा संभव आहे.

- Advertisement -
हेच का ते अभियंता महाशय….

जिल्हा परिषदेच्या कामकाजासंदर्भात झेडपी सीईओ पत्रकारांशी साप्ताहिक बैठकीत वार्तालाप करत असतात. काही वेळेला कामांसदर्भात माहिती देण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांना देखील या बेठकीत बोलावण्यात येते. अशावेळी सीईआेंच्यासमोर पत्रकारांशी अतिशय नम्र भाषेत वार्तालाप करणार्‍या या अभियंता महाशयांकडून अशाप्रकारच्या निर्ढावलेल्या अन बेफिकीर उत्तरांमुळे हेच का ते अभियंता महाशय असा प्रश्न दैनिक महानगरला पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -