घरमहाराष्ट्रनाशिकरोहिले ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून उजळली जिल्हा परिषद शाळा

रोहिले ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून उजळली जिल्हा परिषद शाळा

Subscribe

वीज बिलाच्या कटकटीतून शाळेची कायमची सुटका

बोलठाण : वाढीव दराने वीजबिल, वारंवार होणारे लोडशेडिंग आणि ऐन मोक्याच्या वेळेला जाणारी वीज हे चित्र आपल्याला जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बाबतीत नेहमी पहावयास मिळते. परंतु आता रोहिले बुद्रुक तालुका नांदगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा मात्र याला अपवाद ठरलीय. शिक्षणाच्या बाबतीत दक्ष ग्रामपंचायतीने शाळेकडे लक्ष देऊन शाळेसाठी आपल्या निधीतून सौरऊर्जा संच बसवून दिला. त्यामुळे आता वीज बिलाच्या कटकटीतून शाळेची मात्र कायमची सुटका झाली.
एक किलोवॅट क्षमतेचा, अत्यंत दर्जेदार साहित्याचा संच पाहून सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. ऑनलाईन, अद्ययावत व आधुनिक शिक्षणासाठी आवश्यक असलेला मार्ग आता शाळेसाठी प्रशस्त झाला आहे. याकामी रोहिले बुद्रुक गावच्या सरपंच रमाबाई कंसराज नरवडे, उपसरपंच कल्पना अनिल अरबूज, तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,  कार्यतत्पर ग्रामसेवक भगवान जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून हा संच शाळेसाठी उपलब्ध करून देण्यात आला. याबद्दल गावातील सर्व शिक्षणप्रेमी नागरिक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी संबंधितांचे आभार मानले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -