घरमहाराष्ट्रजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'मोदी लघुपटा'ची सक्ती

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘मोदी लघुपटा’ची सक्ती

Subscribe

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखवण्याची सक्ती करण्यात आली आहे. 'चलो जीते हैं' असे या लघुपटाचे नाव असून येत्या १८ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजता या लघुपटाचे स्ट्रिमिंग केले जाणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखवण्याची सक्ती करण्यात आली आहे. हा लघुपट विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा लघुपट अर्ध्या तासाचा असणार असून हा लघुपट सर्व विद्यार्थ्यांनी पाहावा असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. या लघुपटाचा अभ्यास विद्यार्थ्यांना येत्या १८ सप्टेंबर पासून करावा लागणार आहे. मात्र या निर्णयाला शिक्षण क्षेत्रातून विरोध होत असून शिक्षणाच्या नावाखाली प्रचार करण्यात येत असल्याची टीका देखील केली जात आहे.

हा आहे लघुपट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य जीवनावर आधारित एक लघुपट काढण्यात आला आहे. ‘चलो जीते हैं’ असे या लघुपटाचे नाव असून याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी केले आहे. हा लघुपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटावर आधारित आहे. हा लघुपट येत्या १८ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजता या लघुपटाचे स्ट्रिमिंग केले जाणार आहेत. त्यासाठी सर्व शाळांनी तांत्रिक पूर्वतयारी करणे आवश्यक असून त्यासाठीच्या सूचना विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

काय लिहीले आहे या आदेशात?

हा लघुपट विद्यार्थ्यांनी पहावा यासाठी तयार करण्यात आला आहे. आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही केली जावी, असे या आदेशात म्हटले आहे. या संदर्भातील आदेश थेट मंत्रालय स्तरावरुन काढण्यात आले आहेत. हे आदेश मंत्रालय स्तरावरुन जिल्हा परिषद, महापालिकांचे शिक्षण प्रमुख आणि शिक्षण विभागामार्फत हे आदेश पुढे पाठवण्याचे सांगण्यात आले आहे. येत्या दोन दिवसापर्यंत सर्व शाळांपर्यंत हे आदेश पाठवण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

मुंबईत करण्यात आले प्रिमिअर

या लघुपटाचे प्रिमिअर मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या प्रिमियरला अनेक अभिनेते, क्रीडापटू आणि उद्योजक यांनी उपस्थिती लावली होती.

- Advertisement -

शाळांनी काय करावे?

सर्व शाळांनी या लघुपटाच्या प्रक्षेपणासाठी लॅपटॉप किंवा संगणकाची सोय करावी. त्यासोबत एक एमबीपीएस वेग असलेल्या इंटरनेटची जोडणी असणे आवश्यक आहे. तर प्रोजेक्टर, स्क्रिन आणि स्पीकर्सची व्यवस्था करण्याचे देखील आदेश शाळांना देण्यात आले आहेत.

‘चलो जीते हैं’ या लघुपटात अतिशय सुरेख आणि प्रेरणादायी संदेश देण्यात आला आहे. स्वत:साठी नव्हे, तर इतरांसाठी जगणे ही आपली समृद्द संस्कृती आहे. आपल्या जीवनातील आणि कुटुंबातील सर्व प्रतिकूलतेवर मात करुन स्वत:चे जीवन जगत असताना इतरांची दु:ख नुसती ओळखायचीच नाही, तर त्यावर समाधान शोधायचे. मला खात्री आहे की हा लघुपट अनेकंना प्रेरणादायी ठरणारा असेल. असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

सरकारने त्यांना जे काही लघुपट असो किंवा चित्रपट दाखवायचे ते दाखवावे, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र हे करत असताना शिक्षकांच्या नेमणुका करुन विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण देण्याकडे लक्ष द्यावे.  – कपिल पाटील, शिक्षक आमदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -