बॉलीवूड सुपरस्टार असलेला आमिर खान नेहमीच त्याच्या वक्तव्यांमुळे आणि इतर कलाकारांपेक्षा असलेल्या वेगळेपणामुळे चर्चेत असतो. नुकताच त्याने एक खुलासा केला आहे ज्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.
आमिरने सांगितलं की तो त्याची मुलगी आयरा हिच्यासोबत एक खास थेरपी घेत आहे. ज्यामुळे आमिर खानच्या वडील-मुलीच्या नात्याला बळकटी मिळू शकेल. या व्यतिरिक्त सुपरस्टारने थेरपीबाबत चाहत्यांना सल्लाही दिला आहे. जाणून घेऊयात आमिर खान काय काय बोलला आहे याबाबत.
आमिर खान घेतोय थेरपी :
आजकाल असं पाहिलं जातं की लोक मन: शांतीसाठी आणि अन्य काही कारणांसाठी विशेष मानसिक थेरपी सेशनची मदत घेत असतात. आता या सुपरस्टारनेही या गोष्टीबाबत असा खुलासा केला आहे की तो त्याच्या मुलीसोबतचे नाते अधिक घट्ट व्हावे यासाठी थेरपी घेत आहे. हल्लीच आमिर खानने ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या पॉडकास्ट मध्ये मानसिक आरोग्यावर मोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत.
त्याने म्हटलं की मी माझ्या मुलीसोबत संयुक्त थेरपी घेत आहे. आमच्या नात्यामध्ये जे काही मतभेद आहेत त्यांना मिटवण्यासाठी मी काम करतोय. आधी मला थेरपी घेणं थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं पण आता मला समजतंय की हे किती गरजेचं आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की थेरपिस्टला भेटण्यासाठी कधीही संकोच करू नये. आताच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून आम्ही दोघे थेरपिस्टकडे जातोय. ही थेरपी परिणामकारक ठरू शकते.
याव्यतिरिक्त आमिरची मुलगी आयरा खाननेही असं सांगितलं की आईवडीलांसोबत असणाऱ्या नातेसंबंधांमध्ये संतुलन राहण्यासाठी थेरपी फायदेशीर ठरू शकते.
या चित्रपटांमध्ये दिसणार आमिर खान :
लाल सिंह चढ्ढा या चित्रपटानंतर जवळपास 2 वर्षे आमिर खान सिल्व्हर स्क्रीनपासून दूर राहिला आहे. परंतु येत्या काळात आमिर अनेक नव्या आणि शानदार चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आमिरचे नवीन येणारे चित्रपट म्हणजे गजनी 2, सितारे जमीन पर, कुली आणि लाहोर 1947 हे आहेत.
हेही वाचा : Gypsy Marathi Movie : सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या नामांकनात ‘जिप्सी’ हा मराठी चित्रपट
Edited By – Tanvi Gundaye