हिवाळ्याची सुरुवात झाली आहे. सकाळीदेखील हवेत गारठा जाणवू लागला आहे. सकाळी वातावरणात धुक्याची चादर पसरलेली आपल्याला दिसते. पण शहरासारख्या ठिकाणी वाढत्या प्रदूषणामुळे ही नेमकी धुक्याची चादर आहे की हे वायू प्रदूषण आहे असा प्रश्न पडू लागला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे हवा विषारी बनली आहे. आणि खराब हवेमुळे श्वास घेणेही कठीण होऊ लागले आहे. वायूप्रदूषण ह अनेक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण करू शकते. यापासून होणाऱ्या नुकसानामध्ये हृदयाशी संबंधित समस्या , श्वसनाचे आजार इत्यादी अनेक समस्या समाविष्ट आहेत. परंतु जाणून घेऊयात की वायूप्रदूषण हे वजन वाढण्याचं कारण ठरू शकते का याविषयी.
रिसर्चनुसार, पार्टिक्युलेट मॅटर , नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड यांच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्यास इंफ्लेमेशन आणि मेटाबॉलिज्म याच्या समस्या निर्माण होतात. जे वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. जाणून घेऊयात कशाप्रकारे वायू प्रदूषण हे वजन वाढण्याचे कारण ठरू शकते याविषयी.
वायूप्रदूषण आणि वजन वाढण्याचे कनेक्शन :
वायूप्रदूषण हे वजन वाढण्याच्या अनेक रिस्क फॅक्टर्सपैकी एक आहे. वाढत्या वायूप्रदूषणामुळे किंवा ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुलांमधील वजन वाढते. असं यासाठी कारण लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलं ही जास्त अॅक्टिव्ह असतात. आणि त्यामुळेच ती खेळताना जोरजोरात श्वासोच्छवास करतात. यामुळेच वयस्कर व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांमध्ये वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.
अभ्यासात समजले कनेक्शन :
याव्यतिरिक्त एका संशोधनानुसार, वायूप्रदूषणामुळे शरीरातील पेशींमध्ये सूज निर्माण होऊ लागते. व फॅटदेखील जमा होतात. विषारी वायूमध्ये श्वास घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती आणि श्वासनलिका यांच्यावर परिणाम होतो. यामुळे सूज आणि तणाव वाढतात.
या प्रकारांनी वजन वाढवते वायू प्रदूषण :
संशोधनानुसार, वायूप्रदूषण हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज आणि फुप्फुसांचा आजार यासारख्या आजारांच्या अधिक समस्या निर्माण करतं. वायूप्रदूषण हे पचनसंस्थेशी संबंधित आजारांचेही कारण बनू शकते. ज्यामुळेच वजनही वाढते. याव्यतिरिक्त दूषित हवेच्या संपर्कात आल्यामुळे लोक शारीरिक हालचाली कमी करतात ज्यामुळे वजन वाढू शकते.
हेही वाचा : Tea : चहा बनवताना आलं कधी टाकावं?
Edited By – Tanvi Gundaye