Thursday, November 28, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीFashionWinter Fashion Tips : जुनं स्वेटर दिसेल नवं

Winter Fashion Tips : जुनं स्वेटर दिसेल नवं

Subscribe

हिवाळा सुरु झालेला असून, आपण आपल्या स्वेटरची घडी मोडतो आणि वापरायला सुरूवात करताे. काही स्वेटर्स असे असतात जे अनेक वर्षं टिकतात. या स्वेटरचा वापर आपण वर्षानुवर्षे करतो. आजकाल बदलत्या फॅशनमुळे स्वेटरचे देखील असंख्य प्रकार आले आहेत .त्यामुळे आपण प्रत्येक हिवाळ्यात स्वेटर घेतो. परंतु आता तुम्ही तुमच्या जुन्या स्वेटरचा देखील लूक बदलू शकता आज आपण जाणून घेऊयात, जुन्या स्वेटरला नवीन लूक कसा द्याचा.

बेल्टचा उपयोग करा

तुम्ही तुमच्या जुन्या स्वेटरला नवीन लूक देण्यासाठी बेल्टचा वापर करू शकता. तुम्ही बेल्टच्या साहाय्याने बेसिक स्वेटरला फॅन्सी बनवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्वेटरला बेल्ट लावाव लागेल. तुम्हाला एक क्लासिक लूक देखील मिळेल. यावर तुम्ही जॅकेट किंवा स्कार्फ देखील घेऊ शकता.

- Advertisement -

स्वेटर टक करून घ्या

तुमच्या बेसिक स्वेटरला तुम्ही मागून टक करून घ्या. टक करून घेतल्याने तुम्हाला एक परफेक्ट लूक मिळेल. स्वेटर मागून टक करून घेण्यासाठी तुम्हाला एक रबर बँड लागेल. रबर बँडने तुम्ही मागून स्वेटर टक करून घ्या. तुमचा हा लूक खूप क्लासिक वाटेल.

शर्ट और स्कर्टसह ट्राय करा

थंडीच्या दिवसात तुम्ही हा लूक करू शकता. ऑफिस किंवा कोणत्या खास कार्यक्रमासाठी हा लूक उत्तम आहे. यासाठी तुम्हाला बेसिक स्वेटर लागेल. तुम्ही तुमचं हे बेसिक शर्ट हे बॉटम वेअर किंवा स्कर्टसह ट्राय करू शकता. तुम्हाला एक हटके आणि आकर्षक लूक मिळेल. तुमचा हा लूक या सीझनसाठी उत्तम आहे.

- Advertisement -

स्वेटरला फ्रेंच लूक द्या

तुम्ही तुमच्या जुन्या स्वेटरला फ्रेंच लूक देऊ शकता. तुम्ही फ्रेंच लूकसाठी स्वेटर हाफ टक करा किंवा तुम्ही बॅगी लूक देखील करू शकता. हे स्वेटर तुम्ही जीन्स, स्कर्टसह परिधान करू शकता .

स्वेटरला टॉप सारखा लूक द्या

तुमच्या जुन्या स्वेटरला टॉप सारखा देखील लूक देऊ शकता. तुमचा हा लूक खूप हटके आणि सुंदर दिसेल.

हेही वाचा : Winter Hair Care Tips : हिवाळ्यात स्कैल्प ड्राय होण्याची समस्या या टिप्सने कमी होईल


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini