हिवाळा ऋतू केसांसाठी त्रासदायक आणि आव्हान देणारा असतो. हिवाळ्यातील वातावरण थंड असते. या वातावरणात केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत होतात. अशा परिस्थितीत केसांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे. केस मऊ आणि दाट राहण्यासाठी बरेचजण केसांना मेहंदी लावतात. मेहंदी स्वभावाने थंड असते आणि हिवाळ्यातील वातवरणात गारवा असतो. अशा वातावरणात केसांना मेहंदी लावावी का? असा प्रश्न सर्वाना पडतो. तुम्हीही या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.
हिवाळ्यात केसांना मेहंदी लावल्याने तुम्हाला सर्दी-खोकल्याची तक्रार सुरू होते. त्यामुळे थंड वातावरणात मेहंदी लावल्याने केसांवर होणारे दुष्परिणाम आणि लावताना घ्यायची खबरदारी याविषयी जाणून घेऊयात,
हिवाळ्यात केसांना मेहंदी लावण्याचे परिणाम –
- स्त्रिया आणि पुरुषमंडळी पांढरे केस काळे करण्यासाठी केसांना मेहंदी लावतात. मेहंदी ही नैसर्गिक असल्याने केसांवर त्याचे दुष्परिणाम होत नाही. पण, हिवाळ्यातील वातावरण पाहता मेहंदी थंड असल्याने हिवाळ्यात केसांना मेहंदी लावणे त्रासदायक ठरू शकते.
- हिवाळ्यात केसांना मेहंदी लावल्याने केस ड्राय होऊ शकतात. एकतर आधीच वातावरणातील गारव्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव झालेले असतात. अशात तुम्ही जर मेहंदीचा केसांना लावलीत तर केस अधिक ड्राय होऊ शकतात.
- मेहंदी थंड असते. ज्यामुळे मेहंदी केसांवर लावल्याने शरीरात थंडावा निर्माण होऊ शकतो. मेहंदी केसांवर लावल्याने खोकला आणि सर्दीसारख्या समस्या निर्माम होऊ शकतात.
- हिवाळ्यातील कोरड्या वातावरणामुळे स्कॅल्प ड्राय होतो. अशात तुम्ही मेहंदी लावल्याने केसात कोंडा निर्माण होऊ शकतो.
मेहंदी लावण्यासाठी सोप्या टिप्स –
- मेहंदीमध्ये मॉइश्चरायइज घटक वापरणे फायद्याचे ठरेल. मॉइश्चरायइज घटकांमध्ये दही, खोबरेल तेलाचा पर्याय तुम्हाला आहेत.
- केसांना मेहंदी लावण्यासाठी पेस्ट तयार करण्यात येते. पेस्ट तयार करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. मेहंदीची पेस्ट बनवताना कोमट पाण्याचा वापर केल्याने मेहंदी केसांना व्यवस्थित लागते.
- केसांची मेहंदी काढल्यानंतर स्कॅल्पला हलक्या हाताने मसाज करावा.
किती वेळ केसांना मेंहदी ठेवावी –
हिवाळ्यात तुम्ही जर केसांना मेहंदी लावणार असाल तर 2 तासांपेक्षा जास्त वेळ लावून ठेवू नयेत. जास्त वेळ थंड मेहंदी केसांना लावून ठेवल्याने सर्दी – खोकला आणि तापाची समस्या उद्भवू शकते.
हेही पाहा –