Sunday, January 5, 2025
HomeमानिनीReligiousVastu Tips : तिजोरीत ठेवा कमळाचे फूल, आर्थिक चणचणी होतील दूर

Vastu Tips : तिजोरीत ठेवा कमळाचे फूल, आर्थिक चणचणी होतील दूर

Subscribe

आयुष्यात प्रत्येकालाच सुख, समुद्धी आणि धन हवे असते. आपल्या आयुष्यातील प्रगतीतील सर्व अडथळे दूर होऊन यशाचे शिखर आपण गाठावे अशी इच्छा सर्वेच बाळगतात. यासाठी जितकी मेहनत घेतली जाते तितकीच देवाजवळ मनोभावे प्रार्थना देखील केली जाते. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात, देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आज आम्ही याचसंदर्भात एक उपाय तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि पैशांची चणचण तुम्हाला जाणवणार नाही.

कमळाचे फूल आपणा सर्वाना माहित आहे. हे फूल जितके सुंदर आहे तितकेच शास्त्रानुसार याला महत्त्व आहे. कमळाचे फूल धार्मिक विधींमध्ये वापरण्यात येते. याशिवाय देवी लक्ष्मीचे आवडते फूल आहे. त्यामुळे याचा वापर करून तुम्ही देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव ठेवू शकता.

- Advertisement -

तिजोरीत ठेवा –

देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अत्यंत प्रिय असल्याने तुम्ही तिजोरीत ठेवू शकता. यासाठी तुम्हाला शुक्रवारी कमळाचे फूल खरेदी करून देवीला वाहायचे आहे. देवीला फूल अर्पण केल्यानंतर हे फूल तुम्हाला तिजोरीत ठेवायचे आहे. या उपायामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

कमळाचे खालील उपाय करता येतील –

  • महिन्यातील कोणत्याही एकादशीला कमळाचे फूल घेऊन भगवान श्री कृष्णाला अर्पण करावेत. यामुळे संतानप्राप्ती होऊ शकते असे म्हटले जाते.
  • कुटूंबात वारंवार वाद होत असतील तर श्री गणेशाला कमळाचे फूल मनोभावे अर्पण करावे. दर बुधवारी तुम्ही असे केल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. कमळाच्या फूलाच्या उपायाने कुटूंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि भांडणे होत नाही.
  • शास्त्रानुसार, कमळाचे फूल शुभ मानले जाते. तुम्ही मनोवाच्छित इच्छेसाठी महादेवाला कमळाचे फूल अर्पण करू शकता.
  • विशेष करून कमळाचे फूल गुलाबी रंगाचे आढळून येते. पण, गुलाबी रंगाप्रमाणेच पांढऱ्या रंगाचे कमळाचे फूलही शुभ असते. तुम्ही 11 शुक्रवार पांढऱ्या रंगाचे कमळाचे फूल देवी लक्ष्मीला अर्पित करू शकता. या उपायामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील.

 

- Advertisement -

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini