Saturday, January 4, 2025
HomeमानिनीRecipeKitchen Tips : घरी पॅनकेक बनवताना टाळाव्यात या चुका

Kitchen Tips : घरी पॅनकेक बनवताना टाळाव्यात या चुका

Subscribe

पॅनकेक लहान मुलांच्या आवडीची डिश आहे. घरी लहान मुलांची पार्टी असेल, बर्थडे असेल तर पॅनकेकचा मेन्यू हमखास असतो. बटाटा, केळी, शेंगदाणे या पदार्थापासून पॅनकेक बनवले जातात. या पदार्थापासून तयार करण्यात आलेले पॅनकेक मुलांसाठी पौष्टिक असतात. काही वेळा महिला बाजारातून पॅनकेक विकत आणतात तर काही घरी बनवतात. पण, घरी पॅनकेक बनवताना क्षुल्लक चुकांमुळे पॅनकेकचा बेत फसतो. असं तुमच्याही बाबतीत होत का? त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फल्फी पॅनकेक होण्यासाठी घरी पॅनकेक बनवताना कोणत्या चुका करणे टाळायला हव्यात हे सांगणार आहोत.

पॅनकेक बनवताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात –

टिप 1

- Advertisement -

पॅनकेक बनवताना सर्वात पहिली टिप म्हणजे थंड पॅनवर बटर लावू नये. तुम्ही जर थंड पॅनवर बटर लावलेत तर पॅनकेक खराब होऊ शकतो.

- Advertisement -

टिप 2

ज्या तव्यात पॅनकेक बनवणार आहात, तो तवा जास्त थंड किंवा गरम नसावा.

टिप 3

पॅनकेक मध्यम आचेवर शिजवावा. या टिपमुळे पॅनकेक तव्याला चिकटत नाही.

टिप 4

काहींना पॅनकेकमध्ये साखर घातलेली आवडत नाही, साखरेऐवजी दुसरे पर्याय घालतात. पण, खरं तर पॅनकेकमध्ये साखरेचाच वापर करणे फायद्याचे असते. जेव्हा तुम्ही पॅनकेकमध्ये साखर घालता तेव्हा साखर खड्यासारखी होते, ज्यामुळे चव परफेक्ट तयार होते.

टिप 5

पॅनकेक बनवताना साहित्य मोजूनच घ्यावे. अचूक प्रमाणातील साहित्यांमुळे पॅनकेक मऊ आणि चवीलाही उत्तम बनतो.

टिप 6

पॅनकेकचे बॅटर तुम्ही आदल्या रात्री बनवूव ठेवू शकता. यामुळे बॅटर चांगले आंबेल. बॅटर चांगले आंबले गेल्यामुळे पॅनकेक स्वादिष्ट तयार होतो.

तुम्ही पॅनकेक बनवताना दिलेल्या या सोप्या टिप्स फॉलो केल्यात तर पॅनकेकचा बेत फसणार नाही.

 

 

 

 

हेही पाहा –


 

- Advertisment -

Manini