आपल्याला लहानपणापासून वयाने ज्येष्ठ व महान व्यक्तींच्या पाया पडून त्यांचे आशिर्वाद घ्यावे असे सांगितले जाते. कारण ती आपली संस्कृती आहे. त्यामुळे आपण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या किंवा नात्या आणि पदापेक्षा मोठ्या व्यक्तींच्या सरसकट पाया पडतो. पण खरं तर हिंदू धर्मशास्त्रात जसे पूजा विधींसाठी काही नियम ठरवून देण्यात आलेले आहेत तसेच नियम पाया पडण्यासाठीही आहेत. ज्याबद्दल आपल्यापैकी फार जणांना माहीत नाही. यामुळे पाया पडण्याचे कोणते नियम आहेत जे समजून घेऊया.
हिंदू धर्मशास्त्राच्या नियमानुसार सरसकट सगळ्या व्यक्तींच्या पाया पडल्याने आशिर्वाद तर मिळत नाही पण पाप मात्र नक्की लागते.
यात सर्वप्रथम जावयाने कधीही सासऱ्यांच्या पाया पडू नयेत. कारण असे मानले जाते की भगवान शंकराने आपले सासरे प्रजापती राजा दक्ष यांचा शिरच्छेद केला होता. तेव्हापासूनच जावयाने सासऱ्यांच्या पाया पडून नये हा नियम प्रचलित झाला.
तसेच कोणत्याही व्यक्तीने कधीही मामाच्या पाया पडू नयेत. यामागेही कथा असून भगवान श्री कृष्णाने मामा कंस याचा वध केला होता. तेव्हापासून मामाच्या पाया न पडण्याचा नियम सुरू करण्यात आला.यामुळे मामाच्या पाया पडू नयेत.
त्याचबरोबर हिंदू धर्मात कुमारीका कन्येला देवीचे रुप मानले जाते. म्हणूनच कुमारिका मुलींनी कोणाच्याही पाया पडू नयेत. तसेच कुमारीका मुलींच्याही पाया पडू नयेत. त्यामुळे पाप लागते असे म्हटले जाते.
सनातन धर्मात कोणत्याही झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये.कारण आपल्याकडे झोपलेल्या अवस्थेतील मृत व्यक्तीच्या पाया पडल्या जातात.
तसेच जर तुम्हाला मंदिरात किंवा इतर धर्मस्थळावर कोणी ओळखीची ज्येष्ठ व्यक्ती भेटली तर चुकूनही तिच्या पाया पडू नयेत. कारण साक्षात ईश्वराचे स्थान असलेल्या मंदिरात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नसते. यामुळे जर या ठिकाणी तुम्ही कोणाच्या पाया पडलात तर परमेश्वराचा अपमान केल्याचे दु्र्भाग्य तुम्हाला लाभते.